ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

सपने नही हकीकत बुनते है -इसलिये तो सब मोदीको चुभते है -लोकसभेसाठी भाजपची टॅग लाईन जाहीर



नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. स्वतः पंतप्रधान मोदी निवडणुकीच्या तयारीवर लक्ष ठेऊन आहेत. सपने नही हकीकत बुनते है इसीलिये तो सब मोदीको चुभते है ! अशी टॅग लाईन तयार करण्यात आली आहे . आणि विशेष म्हणजे २२ जानेवारीला रामल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर भाजप लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असल्याचे समजते .
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. हिंदी भाषिक राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये मिळालेल्या दणदणीत विजयाने उत्साही झालेल्या भाजपने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. विरोधकांकडून बैठकांचा जोर सुरू असताना दुसरीकडे आता भाजपकडून पुढील महिन्यातच थेट उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच भाजपकडून उमेदवारांची घोषणा सुरू होणार असल्याचे समजते
विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वीच उमेदवारांची घोषणा सुरू होणार आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पहिली यादी जाहीर होऊ शकते.

error: Content is protected !!