ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

११ पालिका सहाय्यक उद्यान अधीक्षकांच्या बदल्या

मुंबई/ मुंबई महापालिका उद्यान खात्यातील प्रशासकीय व्यवस्थे अंतर्गत, सहाय्यक उद्यान अधीक्षक या पदावरील, व इतर पदांवरील कर्मचाऱ्यांच्या अन्य खात्यात बदल्या करण्यात आले असून , या सर्वांना तात्काळ बदलीच्या ठिकाणी जाण्याचे आदेश देण्यात आले होते. ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत त्यामध्ये
१) विशाल साठे सहाय्यक आयुक्त ए व बी विभाग यांची बदली एम- पूर्व विभागात करण्यात आली आहे. २) अमोल वसईकर सहाय्यक आयुक्त एफ – दक्षिण विभाग यांना एच – पश्चिम विभागात पाठवण्यात आले आहे. ३) जगदीश भोईर सहाय्यक आयुक्त टी विभाग यांना एम- पश्चिम विभागात बदली करण्यात आली आहे. ४) निलेश धनवडे सहाय्यक अभियंता न.वी.( जलकामे) याना सहाय्यक आयुक्त म्हणून आर – उत्तर विभागात पाठवण्यात आले आहे. ५) जनार्दन माने सहाय्यक आयुक्त  आर – उत्तर विभाग यांना आर- मध्य विभागात पाठवण्यात आले आहे. ६) संदीप राऊत सहाय्यक आयुक्त एफ – उत्तर विभाग यांना टी विभागात पाठवण्यात आले आहे. ७) हेमंत पाटील सहाय्यक आयुक्त आर – मध्य विभाग यांना एच -पूर्व विभागात पाठवण्यात आले आहे. ८) अनिल करंदीकर सहाय्यक आयुक्त एम- पूर्व यांना सी व डी विभागात पाठवण्यात आले आहे. ९) सुदर्शन आवारे सहाय्यक आयुक्त एम- पश्चिम विभाग यांना ए व  बी विविध विभागात पाठवण्यात आले आहे . 10) श्रीमती शर्वरी घोलप उपप्रमुख जल अभियंता (भा.स.) यांना सहाय्यक आयुक्त एफ दक्षिण विभागात पाठवण्यात आले आहे. ११) संदीप शेलार सहाय्यक अभियंता शहर जलकामे यांना एफ- उत्तर विभागात पाठवण्यात आले आहे. 12) ऋषिकेश हेंद्रे सहाय्यक आयुक्त ई विभाग यांना अनुसूचित पदाच्या मान्यता आदेशानुसार सहाय्यक उद्यान अधीक्षक ई विभाग हे जल विभाग शहर म्हणूनही काम पाहतील. १३) शरद बागुल सहाय्यक आयुक्त एन विभाग हे अनुसूचित पदाच्या मान्यता आदेशानुसार सहाय्यक उद्यान अधीक्षक यांनी एन विभाग जल अभियंता पवई या विभागाचेही कामकाज पाहतील. १४) सुजित मोहिते सहाय्यक आयुक्त एस विभाग यांना अनुसूचित पदाच्या मान्यता आदेशानुसार सहाय्यक उद्यान अधीक्षक एस विभाग हे जल अभियंता भांडुप संकुल या विभागाचे कामकाज पाहतील.
अशा पद्धतीने पालिका अधिकाऱ्यांच्या बदल्या उपायुक्त-उद्याने, किशोर गांधी यांच्या आदेशाने करण्यात आल्या  आहेत

error: Content is protected !!