ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल

मुंबई/ औरंगाबादच्या सभेत केलेल्या स्फोटक भाषणं प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादच्या सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून औरंगाबाद पोलीस त्यांचा ताबा घेण्यासाठी मुंबईत दखल होणार आहेत .
औरंगाबाद मधील सभेत राज ठाकरे यांनी सभेसाठी घातलेल्या 16 पैकी 12 अटींचे राजने उल्लंघन केले त्यामुळे याबाबतचा अहवाल गृहमंत्र्यांनी मागवला होता तो अहवाल पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी गृहमंत्र्यांना दिला होता . त्यानंतर गृहमंत्री मुख्यमंत्री आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची एक बैठक घेऊन राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला . त्यानुसार औरंगाबादच्या सिटी चौक पोलिस ठाण्यात राज आणि सभेच्या आयोजकांवर कलम 116,117,135 153 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात त्यांना अटक होऊ शकते तसेच मनसेच्या 15 हजार कार्यकर्त्यांना नोटीस देण्यात आली असून चांदिवली येथे भोंगा लावण्याचा प्रयत्न करणारा मनसेचा विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली याला अटक करण्यात आली आहे .

error: Content is protected !!