ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

विरोधकांची तकलादू एकी-सर्व विरोधकांच्या कुंडल्या मोदींकडे


केंद्रातील भाजपा सरकार आणि पंतप्रधान मोदी यांची मनमानी यामुळे भाजपला देशात सक्षम पर्याय असावा असे प्रत्येकाला वाटते आहे. त्यासाठीच विरोधी पक्षाच्या एकजुटिकडे लोक डोळे लावून आहेत. पण विरोधी पक्ष तात्पुरते एकत्र येतात आणि पुन्हा आल्या वाटेने माघारी जातात त्यामुळे विरोधकांवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विरोधकांकडे सक्षम आणि विश्वासू नेतृत्व नाही इंदिरा गांधींच्या मनमानी विरुद्ध जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली विरोधक एकवटले होते आणि त्यांनी जनता पक्षाच्या नावाने सरकारही बनवले पण अवघ्या 17 महिन्यात ते सरकार कोसळले
तेंव्हापासून विरोधी आघड्यांचा खेळ खंडोबा सुरू आहे आणि आता तर गमतीने लोक या विरोधी आघाडीला आघाडी ऐवजी हातगाडी म्हणत आहेत.आणि या विरोधी आघाडीचा आजवरचा इतिहास पाहिला तर त्यांच्यात आणि रिपबलिकन पक्षांच्या तकलादू एक्यात काहीच फरक नाही .हे सर्व इतक्यासाठीच सांगायचे आहे की सध्या पुन्हा एकदा देशात मोदी विरोधी आघाडी बनवण्याच्या हालचालींना वेग आलाय काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी मुंबईत येऊन गेल्या त्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री मुंबईत येऊन गेले त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेऊन भाजप विरोधी आघाडीची आवश्यकता असल्याचे सांगून त्याची सुरुवात महाराष्ट्रातून होत आहे आणि महाराष्ट्रातून सुरू झालेले आंदोलन यशस्वी होते असे सांगितले .चंद्रशेखर राव हे प्रामाणिक आहेत याबद्दल वेगळे सांगायची गरज आहे .पण विरोधी पक्षाच्या आघाडीच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास आहे का ? जे लोक आज महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणून सतेत आहेत तेच लोक एकमेकांचे नगरसेवक फोडून महा विकास आघाडीला कमजोर करीत आहेत. अशा लोकांनी विरोधी पक्षाच्या आघाडीचे नेतृत्व केल्यास त्यावर कुणी विश्वास ठेवेल का ? म्हणूनच अगोदर विरोधी पक्षाच्या आघाडीत सामील होणाऱ्या पक्षांनी आघाडीतील मित्र पक्षांचा विश्वासघात करणार नाही याची एकमेकांना हमी द्यावी आणि नंतरच एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू करावी.कारण विरोधी पक्षाच्या एकीचा हा तमाशा लोकांनी अनेक वेळा पाहिला आहे पुन्हा पुन्हा त्याचे शो नको. उत्तर प्रदेश निवडणुकीत या विरोधी पक्षांमुळेच भाजपला पुन्हा सत्ता मिळणार आहे कारण उत्तर परदेशात सर्व विरोधक एकमेकांच्या विरोधात लढत असल्याने विरोधी पक्षांच्या मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा अर्थातच सत्ताधारी भाजपला होणार आहे .वास्तविक भाजपला जर खरोखरच युपी मध्ये हरवायचे विरोधी पक्षाच्या मनात असते तर सर्वांनी एकटे येऊन भाजपचा मुकाबला केला असता पण तसे झाले नाही आणि होणारही नाही कारण यादव आणि मायावती यांनी त्यांच्या सत्ता काळात जे झोल झपाटे केले आहेत त्याच्या फायली मोदींच्या टेबलावर आहेत त्यामुळे जर सपा -बसपाने एकत्र येऊन निवडणूक पडवली तर दलीत मुस्लिमांची एकगठ्ठा मते त्यांना मिळतील आणि भाजपचा पराभव होईल म्हणूनच भाजपने मायावती आणि अखिलेश यांच्यावर चौकशीचा दबाव टाकून त्यांना वेगवेगळे लढायला भाग पाडले.भाजपच्या विरोधात उभे राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करणाऱ्या सर्व विरोधकांच्या कुंडल्या मोदींकडे आहेत त्यामुळे विरोधकांनी किती जरी आव आणला तरी त्यांचा सध्या तरी मोदींसमोर टिकाव लागणार नाही

error: Content is protected !!