ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

नवे गडी नवा आखाडा

देशाची स्थिती भले कितीही वाईट असो पण पंतप्रधान मोदी मात्र स्वतःची प्रतिमा जागतिक पातळीवर जास्तीत जास्त कशी चांगली होईल तयासाठी धडपडत आहेत. त्यांच्या अमेरिका दौऱ्यात जे चित्र बघायला मिळाले. त्याने भाजपावाल्यांना भलेही आनंद झालेला असला परंतु भारतीय जनतेसाठी मात्र ते चित्र समाधानकारक नव्हते. जगात भारताची प्रतिमा चांगली असायला हवी याबद्दल वादच नाही आणि त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. पण त्या अगोदर देशातली स्थिती सुधारायला हवी देशातलं वातावरण शांततेच आणि सौहारदाच असायला हवं. पण आज तरी देशात तसं वातावरण नाही. आणि म्हणूनच पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्या विषयी लोकांच्या मनात काही फारशी चांगली भावना नाही. अगोदर आपल्या घरातलं बघा आणि नंतर बाहेरच्या जगाकडे लक्ष द्या असं लोकांना वाटते. त्यात काहीही चुकीचे नाही. एकीकडे मोदींचे परदेश दौरे सुरू असतानाच इकडे भारतात 2024 च्या निवडणुकांची तयारी सुरू आहे आणि त्यासाठी 17 विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत. शुक्रवारी बिहारची राजधानी पाटणा येथे सर्व विरोधी पक्ष नेत्यांची एक मोठी बैठक झाली या बैठकीला नितीश कुमार पासून शरद पवारांपर्यंत आणि ममता पासून उद्धव ठाकरे पर्यंत अनेक नेते उपस्थित होते. मोदींच्या विरोधात विरोधी पक्षाची ही एकजूट निश्चितपणे समाधानकारक असली तरी हे विरोधी नेते किती दिवस एकत्र राहतील याबाबत लोकांच्या मनात शंका आहे. तसे पाहता विरोधी पक्षाच्या ऐक्याचा हा काही पहिला प्रयोग नाही. यापूर्वीही असे प्रयोग झालेले आहेत अगदी जनता पार्टीच्या काळापासून आतापर्यंत अनेक वेळा विरोधक एकत्र आले केंद्रात त्यांनी सत्ताही स्थापन केली पण त्यांचे ऐक्य फार काळ टिकू शकले नाही कारण विरोधी पक्षातील प्रत्येक नेत्याची एक महत्वकांक्षा आहे आणि याच महत्त्वकांक्षामुळे नेतृत्वाचा प्रश्न प्रत्येक वेळी उभा राहतो आणि त्यामुळेच ऐक्य मोडते त्यामुळे लोकांचा विरोधी पक्षाच्या ऐक्यावर अजिबात विश्वास नाही. आताही जे 17 विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत त्यातील बहुतेक नेते हे फुटीर आहेत स्वतः नितीश कुमार यांनी अनेक वेळा पक्षांतर केलेले आहे. तर शरद पवार आणि ममता बॅनर्जी काँग्रेस मधले फुटीर आहेत केजरीवाल यांनी तर अण्णांच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना आता केवळ नाममात्र राहिलेली आहे हेमंत सोरेन यांच्या पक्षाला झारखंड बाहेर कोणी ओळखत नाही. मेहबूबा मुफ्ती आणि उमर अब्दुल्ला यांची ही जवळपास अशीच स्थिती आहे. राहता राहिला प्रश्न काँग्रेसचा तर भारतात अजूनही काही लोकांच्या मनात काँग्रेस विषयी आपुलकी आहे आणि त्यातूनच भारतातील पाच राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे पण आज सर्व राज्यांमध्ये काँग्रेसची पक्ष संघटना खिळखीळ झालेली आहे त्यामुळे आम्ही एकट्याने मोदींना टक्कर देऊ शकत नाही हे काँग्रेसने यापूर्वीच कबूल केलेले आहे अशा परिस्थितीत बुडत्याला काडीचा आधार या म्हणीनुसार काँग्रेस विरोधी पक्षांच्या गोतावळ्यात सामील झालेली आहे. काँग्रेसचे ममता बॅनर्जी अखिलेश यादव आणि केजरीवाल यांच्याशी अजिबात पटत नाही त्यामुळे काँग्रेस या सर्वांसोबत एकत्र राहील का हाच खरा प्रश्न आहे.

error: Content is protected !!