[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

गीतेंच्या गीत गायनाचा राष्ट्रवादीकडून समाचार .


मुंबई/ काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसुन राष्ट्रवादीची निर्मिती झाली त्यामुळे शरद पवार हे आमचे नेते होऊच शकत नाही अशी पवारांवर घणाघाती टीका करणाऱ्या शिवसेना नेते अनंत गीते यांचा राष्ट्रवादीने चांगलाच समाचार घेतलाय राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की गीते यांना शिवसेनेतील लोकही जिथे विचारात नाही .तिथे त्यांच्या विषयी काय बोलणार शरद पवार हे राष्ट्रीय नेते असून त्यांच्या वर टीका करणे म्हणजे सूर्यावर भुंकण्या सारखे आहे आज राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार चांगले काम करीत आहे आणि शरद पवार हे सरकारचे मार्गदर्शक आहेत असे असताना गीते यांनी पावरांविषयी बोलताना थोडे तरी भान राखायला हवे होते पण आम्ही अशा लोकांना फारशी किंमत देत नाही असे तटकरे यांनी सांगितले .

error: Content is protected !!