ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हे

वाहतूक पोलिसाला तृतीय पंथाची मारहाण


मुंबई/ तृतीय पंथाची मुजोरी केवळ लोकल ट्रेन मधेच चालते असे नाही तर ते कुठेही लोकांना त्रास देतात काही दिवसांपूर्वी टोल नाक्यावर तृतीय पांथिनी एकाला मारल्याची घटना ताजी असताना गोरेगावच्या बांगुर नगर येथे एका तृतीय पांथियाने चक्क वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याची घटना घडली आहे . या प्रकरणी तृतीय पंथाच्या तिघांना अटक करण्यात आलीय .एक तृतीय पंथी रिक्षाने जात असताना त्या रिक्षाचा रोडवरील प्रवाशाला धक्का लागला .त्यामुळे रिक्षा चालक व तो पादचारी यांच्यात वाद सुरू झाला हा प्रकार पाहून रिक्षात बसलेल्या तृतीय पंथीने बाहेर येवून त्या पदचाऱ्याला मारहाण करू लागला . तसा तिथे हजर असलेला वाहतूक पोलीस मध्यस्थी करण्यास पुढे आला मात्र तृतीय पंथाने त्या वाहतूक पोलिसाला कॉलर धरून मारहाण केली या प्रकरणी त्या तृतीय पंथाचे तिघांना अटक करण्यात आली आहे

error: Content is protected !!