ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

अमोल कोल्हे विरुद्ध महाराष्ट्रात संतापाची लाट

नथुराम वरून राष्ट्रवादीत मतभेद
मुंबई/ व्हाय कील आय गांधी? या चित्रपटात राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ची भूमिका करून त्या भूमिकेतील नथुराम याच्या माध्यमातून गांधी हत्येचे समर्थन केल्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.अमोल कोल्हे याला राष्ट्रवादीतून हाकला अशी मागणी केली जात आहे तर दुसरीकडे नथुराम वरून राष्ट्रवादी मध्येच दोन मत प्रवाह निर्माण झाले आहे.
नथुराम गोडसे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या केली होती त्या प्रकरणात त्याला फाशिही झाली पण आता काही लोक नथुराम गोडसे याचे उदातीकरण करीत आहेत २०१७ मध्ये व्हाय किल आय गांधी नावाचा एक चित्रपट तयार करण्यात आला होता तो आता ओ टी पी प्लॅटफॉर्म वर रिलीज केला जातोय त्याचा गुरुवारी ट्रेलर प्रदर्शित. झाला या चित्रपटात नथुराम गोडसे याची भूमिका राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे त्यावरून महाराष्ट्रात अमोल कोल्हे विरुद्ध संतापाची लाट उसळली आहे तर राष्ट्रवादी पक्षात सुधा दोन मत प्रवाह निर्माण झाले आहेत आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमोल कोल्हे यांची पाठराखण करताना ते कलाकार आहेत त्यामुळे त्यांनी केवळ नथुराम याची भूमिका केलीय त्याचे उदाती करण केलेलं नाही किंवा गांधी हत्येचे समर्थन सुधा केलेले नाही असे म्हटले आहे.तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मात्र कोल्हे यांच्या या चित्रपटाला तीव्र विरोध केला आहे अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीच्या विचार धारे विरुद्ध जाता येणार नाही असे म्हटले आहे तर जितेंद्र आव्हाड यांनी हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा देत अमोल कोल्हे यांनी खडे बोल सुनावले आहेत कलाकार असण्याच्या आडून गांधी हत्येचे समर्थन करणे आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा दिला आहे
दरम्यान आपण एक कलाकार असल्याने वेगवेगळ्या भूमिका करण्याचा आपल्याला अधिकार आहे तसेच या चित्रपटाचे शूटिंग २०१७ मध्ये झाले होते तेंव्हा मी राष्ट्रवादीत नव्हतो त्यामुळे पुढे काय होणार आहे याची आपणास कल्पना नव्हती असा खुलासा अमोल कोल्हे यांनी केला आहे मात्र वााद निर्माण होण्याची शक्यता आहे

error: Content is protected !!