[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

एम आय एम ला महाविकास आघाडीत घेण्यास ठाकरे आणि पवारांचाही नकार


मुंबई/ एम आय एम ही भाजपचीच बी टीम आहे आणि त्यांना महाविकास आघाडीत घुसवून महाविकास आघाडी कमजोर करण्याचा भाजपचाच प्लॅन आहे म्हणूनच आम्ही त्यांच्या कारस्थनाला बळी पडणार नाही असे शिवसेनेकडून काल स्पष्ट करण्यात आले आहे तसेच एम आय एम बरोबर आम्ही कदापि युती करणार नाही असे मुख्यमंत्री उधव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले आहे त्यामुळे एम आय एम ला आघाडीत घुसवण्याचा भाजपचा प्लॅन फसला आहे.
गेल्या काही दिवसांपासून एम आय एम महाविकास आघाडीत घुसण्याचा प्लॅन करीत आहे त्यासाठी एम आय एम चे खासदार इम्तियाज जलील हे शरद पवार आणि उधव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील इतर नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न करीत होते त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळे समीकरण निर्माण होते की काय अशी चर्चा सुरू झाली होती .मात्र काल शिवसेनेच्या जनसंपर्क अभियानाची सुरुवात करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगून टाकले की एम आय एम सोबत आमची कदापि युती होणार नाही . कारण एम आय एम ही भाजपची बी टीम आहे आणि सध्या युपी मधील निवडणुकीत त्यांचे मोठे नुकसान झाल्याने त्यांच्याकडूनच ही कट कारस्थाने सुरू झालेली आहेत मात्र शिवसेना ही कट्टर हिंदुत्ववादी असल्याने एम आय एम बरोबर युती करण्याचा प्रश्नच नाही . मेहबूब सोबत घरोबा करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये अशाशब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवरील तोफ डागली
काल शिवसेनेकडून मुंबई ठाण्यातील लोकप्रतिनिधी आणि इतर नेत्यांशी मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा संवाद साधला आणि सरकारची कामे घरोघरी पोचवा असे आदेश दिले त्याच बरोबर विरोधकांचे कारस्थान ओळखा त्यांच्या कुरपाटिकडे लक्ष ठेवा कारण शिवसेनेला बदनाम करण्याचे काम सुरू आहे त्यामुळे अफवांना आणि अशा करस्थनाना कुणीही बळी पडू नका असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले
दरम्यान उद्वव ठाकरेंच्या या भूमिकेमुळे एम आय एमला आघाडीत घुसवून शिवसेनेला बदनाम करण्याचा भाजपचा प्लॅन फसला असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे

error: Content is protected !!