ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऑर्केस्ट्रा बारच्या परवानगी बाबत झोन एक-दोन आणि तीन पोलिसांकडून भेदभाव ?

मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याने महाराष्ट्रात ब्रेक द चेन अंतर्गत बहुतेक उद्योग धंद्यांना परवानगी देण्यात आली आहे .यात दारू आणि ऑर्केस्ट्रा बार चाही समावेश आहे . मात्र असे असतानाही मुंबईच्या पोलिस झोन 1 – 2 आणि 3 झोन मधील ऑर्केस्ट्रा बारना अजूनही परवानगी देण्यात असलेली नाही अशी माहिती सूत्रा.जर मुंबईतील चार आणि इतर झोन मधील ऑर्केस्ट्रा बार सुरू असतील तर मग एक,दोन,तीन मधील बारना सुधा पोलिसांनी परवानगी द्यायला हवी होती . कारण शेवटी नियम सर्वांना सारखेच आहेत.राज्याला सर्वाधिक महसुली उत्पन्न दारू मधून मिळते त्यामुळे लॉक डाऊन च्या काळातही दारूच्या पार्सल ची परवानगी होती .आता तर सर्व काही सुरू झाले आहे मग पोलीस एका झोन मध्ये ऑर्केस्ट्रा बारना परवानगी देतात आणि एका झोन मध्ये नाही असे का ? असा सवाल ऑर्केस्ट्रा बार मालकाचा आहे. या बाबत मुंबई जनसत्ता प्रतिनिधीने पोलिस झोन एक-दोन आणि तीन झोन डीसीपी याच्या कार्यालयात संपक केले असता प्रतिसाद मिळाला नाही.

माझी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटींच्या खंडणीची काळी छाया ?

ऑर्केस्ट्रा बार कामगारांची उपासमारितून कधी सुटका ?—
कोरोंनाची भीती दाखवून राज्य सरकारने जे कठोर निर्बंध लावले आहेत त्याचा उद्योग धंद्यांना जबरदस्त फटका बसला आहे .या उद्योगांचे आर्थिक नुकसान तर होतंच आहे पण या उद्योगांवर ज्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे अशा लाखो कुटुंबांवर उपासमारीची पाळी आली आहे.या पैकीच एक आहे दारूचे बार.. राज्याच्या एकूण महसुली उत्पणा पैकी जवळपास ३० टक्के महसूल या व्यवसायातून सरकारला मिळतो. बार मालक वर्षाला जवळपास साडेसात लाख रुपये करापोटी सरकारला देतात.पण आज हा व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे बार मध्ये मॅनेजर पासून भांडी घासण्यासाठी असलेल्या कर्मचार्‍या पर्यंत २५ ते 30 लोकांचा स्टाफ असतो. पण हे सगळे लोक आज बेरोजगार झालेत. सरकारने अनलॉक प्रक्रियेअंतर्गत हॉटेल्स ४ वाजेपर्यंत दिली ती वाढवून ९ वाजे पर्यंत उघडी ठेवायला परवानगी दिली आहे.पण बारचा खरा धंदा हा संध्याकाळ पासून रात्री पर्यंत असतो त्यामुळे बार वाले नाराज आहेत.तरीही साधे बार सुरू आहेत पण ऑर्केस्ट्रा असलेल्या बार वाल्यांना काही ठिकणी अप्रत्यक्षरीत्या परवानगी नाही .कारण पोलिसांना वाटतेय की ऑर्केस्ट्रा बार उघडले की तेथे लेडीज डान्स सुरू होतील या भीतीपोटी ऑर्केस्ट्रा असलेल्या बारणा परवानगी दिली नाही. मुंबई शहर परिसरातील चार झोन मध्ये जवळपास ५० हून अधिक बार आहेत .यापैकी १८ ऑर्केस्ट्रा बार तर एकट्या ग्रँट रोड परिसरात आहेत .त्याच बरोबर दक्षिण मुंबईतील कुलाबा कफ परेड पासून मुंबई शहराची हद्द असलेल्या बांद्रा पर्यंत अनेक बार आहेत. मात्र हे सर्व ऑर्केस्ट्रा बार बंद असल्याने या बारमध्ये काम करणाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. एकतर बहुतेक उद्योग धंदे बंद असल्याने दुसरीकडे कुठे नोकरी मिळत नाही मग या लोकांनी जगायचे तरी कसे ? जे बार मालक आहेत त्यांचा वर्षभर धंदा बंद असल्याने ते कर्जबाजारी झाली बँकेचे हप्ते थकल्याने अनेकांना जप्तीची नोटीस आलीय .त्यामुळे काहींनी ऑर्केस्ट्रा बार बंद करण्याचा निर्णय घेतलाय लॉक डाऊन मध्ये काही कर्जबाजारी बार मालकांनी आत्महत्याही केलीय.आता या प्रकरणी ऑर्केस्ट्रा बार मालकांची संघटना “आहार” न्यायालयात गेलीय.तिथे न्यायालय समोर सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे बार मालक आणि त्यावर पोट भरणारे कसे उध्वस्त झालेत ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली जाईल आणि न्यायालयाकडून आम्हाला नक्की न्याय मिळेल असा त्यांना विश्वास आहे.

error: Content is protected !!