ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

पुढील आठवढ्यात पालिकेकडून चायनीज गाड्यांवर कारवाई


मुंबई – रस्त्यावर गाड्या लावून त्यावर अन्नपदार्थ शिजवणे व विकणे हा कायद्याने गुन्हा आहे. कारण अशा अन्नपदार्थांमुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येते मात्र अनेकवेळा सांगूनही फेरीवाले एकात नाहीत . त्यामुळे पुढील आठवढ्या पासून पालिकेने रस्त्यावरील चायनीज आणि इतर अन्नपदार्थांच्या गाड्यांवर कारवाई केली जाणार आहे त्यासाठी मुंबई शहर आणि उपनगरत पालिकेची विशेष पथके राऊंडप करून अशा गाड्या जप्त करणार आहेत तसेच दंडात्मक कारवाई सुद्धा केली जाणार आहे. काही ठिकाणी पालिकेचेच अधिकारी हप्ते घेऊन आपल्या विभागातील चायनीज गाड्या व शिजवलेले अन्नपदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई करीत नाहीत . त्यामुळे असे प्रकार टाळण्यासाठी एका विभागातील अधिकाऱ्याला त्या विभागातील पथकामध्ये न ठेवता दुसऱ्या विभागात पाठवले जाणार आहे ज्यामुळे ज्यांना चायनीजवाल्यांकडून हप्ते सुरु आहेत त्यांना कारवाई करताना कोणालाही पाठीशी घालता येणार नाही , आणि चायनीजवाले व इतर बेकायदेशीर अन्नपदार्थ विकणाऱ्यां विरुद्ध सुरु होणारी मोहीम यशस्वी होईल असे पालिकेकडून सांगण्यात आले. यापूर्वीच्या कारवाई बाबत माहिती देताना पालिकेने सांगितले कि रस्त्यावर शिजवलेले ऍन पदार्थ विकणाऱ्यांचे २०२१ पासून ११,८११ सिलेंडर जप्त करण्यात आले. तसेच लाखोंचा दंडही वसूल करण्यात आला दरम्यान चायनीज गाड्यांवरील कारवाई सायंकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत केली जाणार आहे

error: Content is protected !!