ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

घाटकोपर येथे फेरीवाल्यांचा हॉटेलवर हल्ला – फेरीवाल्यांमुळे नागरिक हैराण, कायमची कारवाईकरण्याची मागणी


मुंबई – मुंबईतील रस्ते अडवून बसलेले फेरीवाले आता मुंबैकरांच्या सुरक्षेसाठी धोका बनू लागले आहेत. कारण फेरीवाल्यांची तक्रार करणाऱ्या विरुद्ध फेरीवाले आक्रमक होऊन त्याच्यावर हल्ला करीत आहेत. घाटकोपर येथे हॉटेलसमोर धंदा लावणाऱ्या फेरीवाल्याची तक्रार केली म्हणून फेरीवाल्यांनी हॉटेलवर हल्ला करून त्या हॉटेलची तोडफोड केली या प्रकरणी पोलिसांनी चार फेरीवाल्या वर हुन्हा दाखल केला आहे.
घाटकोपर रेल्वे स्थानकाला फेरीवाल्यांचा विळखा पडला आहे त्यामुळे स्तेशान्म्ध्ये जाणारे आणि येणार प्रवासी यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. काही फेरीवाले तर रस्त्यावर धंदा लावतात त्यामुळे अह्तुकीला अडचण होते. एमजी रोड, खोत लेन , श्र्धान्न्द रोड होराचंद देसाई मार्ग या रस्त्यांवर आणि फुटपाथवर फेरीवाल्यांचा कब्जा आहे. या प्रकरणी स्थानिकांनी पालकमंत्री मंगल प्रताप लोढा ,उपयुक्त देविदास क्षीरसागर सहाय्यक आयुक्त बल्लाळ पोलीस उपयुक्त पुरषोत्तम कराड आदींकडे तक्रारी केल्या त्यानंतर थोडीफार कारवाई झाली . पण नंतर पुन्हा हे फेरीवाले आपल्या जाग्यावर आले.दरम्यान बिपीन गुप्त यांच्या हॉटेल समोर फेरीह धंदा लावणाऱ्या एका फेरीवाल्याची गुप्ता यांनी रीतसर पालिकेकडे तक्रार केली.त्यानंतर पालिका अहिकारी आले याचा राग आल्यामुळे त्या फेरीवाल्याने आपल्या इतर फेरीवाले साथीदारांच्या मदतीने हॉटेलवर हल्ला केला तोडफोड करून समान बाहेर फेकले . या प्रकरणी गुप्त यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला मात्र या घटनेमुळे परिसरातील दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशावेळी पोलीस आणि पालिका प्रशासन कर भरणाऱ्या व्यावसायिकाची बाजू ऐकणार कि बेकायदेशीर कोणाच्याही दुकानासमोर धंदा लावणाऱ्या फेरीवाल्यांची बाजू ऐकणार हे पोलीस आणि पालिका अधिकार्यांनी जनतेला सांगावे . पण ज्या अर्थी फेरीवाल्यांची इतकी दादागिरी चालते त्या अर्थी फेरीवाल्यांचा कोणतरी गोद्फादार पालिकेत आहे एवढे मात्र नक्की असे घाटकोपर माहोल नागरिक म्हणत आहेत

error: Content is protected !!