ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामहाराष्ट्र

13 वर्षांनी मिळाला न्याय

न्यायपालिका हा लोकशहीचा एक महत्वाचा स्तंभ आहे आणि लोकांचाही न्याय देवतेवर विश्वास आहे पण आज देशाच्या विविध न्यायालयात चार कोटी खटले प्रलंबित आहेत आणि त्या खटल्यातील लाखो अंडर ट्रायल आरोपी तुरुंगात सडत आहेत त्यांनी असेच तुरुंगात सडून मारायचे का? इन्साफ के घर में दर है मगर अंधेर नाही असे म्हटले जाते पण न्यासाठी किती वर्ष वाट बघायची? कालच २००८अधे अहमदाबाद साखळी बॉम्ब स्फोटाचा निकाल लागला आणि 49 दोषपैकी 38 जणांना फाशीची शिक्षा तर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा मिळाली अहमदाबाद साखळी बॉम्ब स्फोटात 56 निरपराध मारले गेले होते. तर 200 हून अधिक लोक जखमी झाले होते. त्यातील कित्येक अपंग झालेले लोक आजही मरणप्राय यातना भोगीत 13 वर्ष निकालाची वाट बघत होते .बॉम्ब स्फोटासारख्या मोठ्या गुन्हेगारी घटनांचे खटले वर्षांनवर्ष पाडून राहू लागल्यास लोकांचा न्यायपालिकेवर असलेला विश्वासाचं उडून जाईल.बरे 13 वर्षांनी जरी निकाल आलेला असला तरी या खटल्याची न्याय प्रक्रिया अजून संपलेली नाही कारण ज्यांना शिक्षा झाली आहे ते आता वरच्या कोर्टात अपील करतील .मग तिथे काही वर्ष जातील पुढे सर्वोच्च न्यायालयात अपील केले जाईल तिथे काही वर्ष जातील हा सगळा टाईमपास कशासाठी ? एकतर अशा घटनांमधील आरोपींना पकडू नका ते जिथे कुठे दिसतील तिथे त्यांचे एन्काऊंटर करा किंवा असा कायदा करा की एकदाका न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली की त्यांना वरच्या न्यायालयात अपील करण्याची सवलतच मिळत नये. त्यांना जी काही खालच्या न्यायालयात शिक्षा होईल तीच ग्राह्य मानून त्या शिक्षेची ताबडतोब अमालबजावणी करावी. तरच या देशातील दहशतवादी कारवाया थांबतील.आणि दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना वचक बसेल.अन्यथा भारतातील दहशतवादी कारवाया थांबणार नाहीत
भारताची न्याय व्यवस्था उत्तम आहे.फक्त त्यात काळानुरूप बदल करून न्यायव्यवस्था अधिक गतिमान करणे गरजेचे होते .पण दुर्दैवाने या देशात तेच होऊ शकले नाही .गुन्हेगारीत बदल झाला आधुनिकता आली पण आमचे कायदे मात्र तेच आहेत त्यात काही काळानुसार बदल होत नाही .त्यामुळे आजही खुनसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अटकेनंतर सुधा दहा ते पंधरा वर्ष सहज शिक्षा होऊनही शिक्षेपासून दूर राहू शकतो इतक्या कायद्यात पळवाटा आहेत.मग असे असेल तर गुन्हेगारीला आला कसा बसणार १९९३ क्या मुंबईतील साखळी बॉम्ब स्फोटमधील दावूद सह जवळपास २० आरोपी अजूनही पोलिसांना सापडलेले नाहीत त्यामुळे यापुढे ते सापडणार कधी? त्यांची चौकशी कधी होणार? त्यांच्यावर न्यायालयात खटला कधी चालणार आणि त्यांना शिक्षा कधी होणार हे सरकारलाही कदाचित ठाऊक नसेल त्यामुळेच भारतातील दहशतवादी कारवाया थांबलेल्या नाहीत आणि थांबणार सुधा नाहीत.कारण सरकार त्याबाबत फार गंभीर दिसत नाही.आणि सरकार जरी गंभीर असेल तरी आपला कायदा अत्यंत कमजोर असल्याने पोलिसांनी किंवा तपास यंत्रणांनी बॉम्ब स्फोटसारख्या घटनांमधील आरोपींना जरी पकडले तरी त्यांच्या विरुद्ध न्यायालयात वर्षांनुवर्श खटले चालू राहतील आणि या खतरनाक गुन्हेगारांचा पाहुणचार करण्याची त्यांना शिक्षा होईपर्यंत पोसण्याची नामुष्की सरकारवर येईल म्हणून खून ,लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार अशा गुन्ह्यातील आरोपींना कायद्याने शिक्षा ठोठावण्ात ऐवजी हैद्राबाद एन्काऊंटर प्रमाणे त्यांना जागच्या जागी ठार मारणे हाच दहशतवाद आणि गंभीर गुन्हेगारी रोखण्यावर एकमेव उपाय आहे.

error: Content is protected !!