[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

लोकसभेच्या जागांवरून वाटपावरूनशिंदे गट -भाजपात रस्सीखेच सुरु


मुंबई : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीला आता काही महिने उरले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी आधीपासूनच लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सलग तिसऱ्यांदा विजयरथ रोखण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी गट एकत्र आले आहेत. त्यांनी इंडिया आघाडीच नाव दिलय. भाजपाने सुद्धा एनडीए अंतर्गत विविध पक्षांची मोट बांधलीय. महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे. मविआ इंडिया आघाडीचा घटक आहे, तर महायुती एनडीएमध्ये आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांमधला प्रत्येकी एक गट मविआ आणि महायुतीमध्ये आहे. महायुतीमध्ये जागा वाटपावरुन रस्सी खेच होऊ शकते. शिवसेना शिंदे गटाने आधीच तसे संकेत दिलेत.
शिवसेना शिंदे गटाने लोकसभेच्या २२ जागांवर दावा केला आहे. २२ जागांवर शिवसेनेचा खासदार निवडून आणण्यावर भर असल्याच राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे. उर्वरित जागांवर भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा करुन निर्णय घेऊन असं ते म्हणाले. काल वर्षा बंगल्यावर खासदारांची बैठक झाली. त्यानंतर राहुल शेवाळे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट सुद्धा आहे. भाजपाने महाराष्ट्रातून लोकसभेच्या 45 जागा जिंकण्याचा निर्धार केलाय. उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक ४८ जागा आहेत. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत. त्यामुळे ही दोन्ही राज्य भाजपासाठी खूप महत्त्वाची आहेत.
शिवसेनेतर्फे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघात निवडणूक लढवण्यात आली होती. त्या सगळ्या मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. शिवसेनेने २२ जागांवर निवडणूक लढवली होती. या बैठकीला सर्व १३ खासदार उपस्थित होते असं राहुल शेवाळे म्हणाले

error: Content is protected !!