ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

पालिकेत अपुरे मनुष्यबळ लोकांची नागरी सुविधांची कामे रखडली


मुंबई/जगातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका अशी मुंबईची ओळख आहे. मुंबई महानगरपालिकेचा 30000 कोटींचा बजेट आहे. परंतु जवळपास अडीच कोटी लोकसंख्या असलेल्या या शहरातून, पालिका जो महसूल वसूल करते, त्या महसुलातून लोकांची नागरी सुविधांची कामे होत नसल्याच्या असंख्य तक्रारी पालिकेकडे येत आहेत. आणि याचे मुख्य कारण आहे पालिकेकडे अपुरे मनुष्यबळ आहे. त्यामुळे नागरी सुविधांची कामे पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर एक लाख ४५ हजार १११ पदे आहेत. त्यातील ८६ हजार ४६४पदे सरळ सेवा पद्धतीने भरली जाणारी आहे .यातील ३८ हजार १०७ पदे रिक्त आहेत. ज्यांना पदोन्नती द्यायची आहे अशी ९२९५ पदे रिक्त आहेत. तर सफाई कामगारांची ४१५५ पदे रिक्त आहेत. एकूण हिशोब केला तर बावन हजार 221 पदे रिक्त आहेत .अडीच कोटी लोकसंख्या असलेले मुंबई महानगर ,या संपूर्ण शहराचे रस्ते, वीज, पाणी ,गटा,र शाळा, आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेची असते .या सगळ्या सुविधा देणारी यंत्रणा मात्र प्रचंड ओझाने दबून गेलेली आहे. कारण मुंबईत रोज हजारो नागरिकांचे लोंढे देशभरातून येत असतात. आणि या सगळ्यांचा ताण मुंबईवर पडत असतो.त्यामुळे मुंबईतील नागरी सुविधा लोकांना अपुऱ्या पडत आहेत .आणि त्यातच जर महापालिकेची ३८ हजार १०७ पद रिक्त असली, तर कामाचा कसा बोजवारा उडू शकतो ,हे मुंबईकर जनता पाहत आहे. त्यामुळे ही रक्त रिक्त पदे कधी भरणार असा सवाल मुंबईकर करीत आहेत. ५२ हजार २२१ रिक्त पदे भरण्यासाठी पालिकेला

निधीची गरज आहे. परंतु पालिकेकडे इतका अफाट पैसा आहे की त्यांना ही रिक्त पदे भरण्यासाठी फार काही मोठे परिश्रम घ्यावे लागणार नाही. किंवा सरकारकडे हात पसरावे लागणार नाहीत. केवळ इच्छाशक्ती हवी आहे. तसेच मुंबईकरांची सेवा करण्याचा प्रामाणिकपणा पालिकेकडे हवा आहे. तरच मुंबईकरांची ही अडचण दूर होईल .जर ही रिक्त पदे भरली, तर मुंबईकरांना व्यवस्थित नागरी सुविधा मिळतील असे मुंबईकर जनतेचे म्हणणे आहे.

error: Content is protected !!