[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामहापालिकामुंबई

पालिकेतील आंधळे दळत आहेत आणि कुत्रे पीठ खात आहेत


बनावट कागदपत्रांच्या आधारे २८वर्ष पालिकेत नोकरी करणाऱ्या भामटयाला अटक
मुंबई/भ्रष्टाचार हा आता या देशाचा स्थायी भाव बनलाय त्यामुळे ग्राम पंचायत पासून राष्ट्रपती भवणापर्यंत असे एकही ठिकाण नाही की जिथे भ्रष्टाचार होत नसेल.पण या सगळ्यात मुंबई महापालिका वरच्या क्रमांकावर आहे.जेवढं नाव मोठं तेवढा भ्रष्टाचार सुधा मोठा .मुंबई महापालिकेत आजवर पालिका अधिकारी,नगरसेवक आणि कंत्राटदारांचे घोटाळे बाहेर निघत होते पण आता सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या सुधा भांगदिना वाचा फुटत आहे .पालिकेत हजेरी लावायची आणि मुकदमाला चिरीमिरी देऊन दुसरीकडे दिवसभर दुसरी नोकरी करायची या गोष्टी तर सर्वश्रुत होत्या पण रमेश मारुती शेलार नावाच्या एका महाभागांनी पालिकेतच काम करणाऱ्या दुसऱ्या एका माणसाची बनावट कागदपत्र बनवून पालिकेत चक्क २८ वर्ष नोकरी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.हे सगळ होत असताना पालिका प्रशासन झोपले होते का? असा सवाल आता मुंबईकर विचारीत असून आणखी काही कर्मचारी बनावट कागदपत्रांच्या आधारे पालिकेच्या सेवेत आहेत का याचीही आता चौकशी करण्याची मागणी मुंबईकर करीत आहेत.
रमेश मारुती शेलार याने बनावट कागदपत्रांच्या आधारे पालिकेला चुना लावताना १९८९ पासून पालिकेच्या सेवेत असलेल्या मारुती साबळे या कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांचा वापर केला या दोघांचे नाव त्यांच्या वडिलांचे नाव आडनाव आणि कार्ड दिवस हुबेहूब बनवण्यात आले.मात्र पालिकेला याची कुणकुण लागताच या प्रकरणातील सत्यता तपासण्यासाठीत्या दोघांकडून जातीचे प्रमाणपत्र मागवण्यात आले .मात्र तेंव्हापासून मारुती शेलार कामावर येण्यास बंद झाला त्यामुळे संशय बळावला आणि मारुती शेलार याच्यावर गुन्हा दखल करून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.मात्र १९९३ पासून हा माणूस पालिकेच्या सेवेत असूनही त्याचा पालिका प्रशासनाला जराही संशय येऊ नये हे कुणालाही पटणारे नाही .यात आणखी कुणाचा तरी हात असावा त्यामुळे या मारुती शेलारचे पालिकेतील पाठीराखे कोण याचा पोलिसांनी शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकाव्यात आणि मारुती शेलार व त्याच्या पठिराख्यांचे सर्व सर्व्हिस जप्त करावे
.

error: Content is protected !!