[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

बुधवारी अनिल देशमुख ई डी समोर आत्मसमर्पण करणार?

मुंबई/ शंभर कोटींच्या खंडणी चे गंभीर आरोप असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ई डी ने पाचव्यांदा समन्स बजावले असून ते ई डी समोर आत्मसमर्पण करण्याची शक्यता आहे .अटक टाळण्यासाठी देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिलेला नाही त्यामुळे आता त्यांच्या समोर आत्मसमर्पण हाच एकमेव पर्याय आहे त्यातच इडी चे त्यांना पाचव्यांदा समन्स निघाले आहे जर यावेळी ते हजर झाली नाही तर त्यांच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी होऊ शकते .त्यामुळेच ते आज आत्मसमर्पण करण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!