ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

पनवती समृद्धी मार्गावर आणखी एक भीषण अपघात १२ ठार

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात झाला असून सैलानी बाबांचे दर्शन घेऊन नाशिक निफाडकडे जाणारी टेम्पो ट्रॅव्हलर गाडी रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला असून २३ जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती वैजापूर पोलिसांनी दिली. हा अपघात रात्री १२ ते १ वाजेच्या दरम्यान जांबरगाव टोल नाका येथे घडला. या प्रकरणाची नोंद वैजापूर पोलीस ठाण्यात घेण्यात आली आहे
अपघातात एकूण २३ प्रवासी गंभीर जखमी झाले असून जखमींवर वैजापूर व छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी व इंदिरानगर भागातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान या अपघातानंतर मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे तर पंतप्रधान मोदी यांनीही केंद्राकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख तर जखमींना ५० हजारांची मदत दिली आहे

error: Content is protected !!