ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मुंबई महापालिकेची निवडणूक रखडली -सर्व पक्षीय इच्छुक नाराज


मुंबई – गेल्या दीड वर्षांपासून रखडलेली मुंबई महापालिकेची निवडणूक आणखी पुढे जाण्याची शक्यता आहे त्यामुळे हि निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्यांमध्ये नाराजी आहे.
मुंबई महानगर पालिकेची मुदत ७ मार्च २०२२ रोजी संपली तत्पूर्वी निवडणूक घेणे अपेक्षित होते.पण कोरोनाचे कारण सांगून निवडणूक ६ महिने पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर निवडणुकीची तयारी सुरु झाली प्रघाग पुनर्रचना व प्रभागांची सोडतही काढण्यात आली. मात्र ठाकरे सरकारने प्रभाग पुनर्रचना करताना प्रभागांची संख्या २२७ वरून २३६ केली होती तो निर्णय नव्या सरकारने बदलला व मुंबई महापालिका प्रभागांची संख्या पूर्वी इतकीच म्हणजे २२७ ठेवली पुढे हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला तिथे नितीन व्हायचा आहे. तर दुसरीकडे २०२४ मध्ये लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणूक होणार असल्याने मुंबई महापालिका आणि राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणूक आणखी रखडणार आहेत . त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक लढवण्यास उत्सुक असलेले इच्छुक नाराज झाले आहेत.

error: Content is protected !!