७९ वा स्वातंत्र्यदिन देशभर उत्साहात साजरा
नवी दिल्ली/ यंदाचा ७९ वा स्वातंत्र्य दीन देशभर उत्साहात साजरा झाला.पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून १०३ मिनिटांचा केलेल्या भाषणात ऑपरेशन सिन्दुर मधील वीर जवानांचे तोंडभरून कौतुक केले. देशाच्या सर्व राज्यांमध्ये त्यात्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ध्वजवंदन केले यावेळी अनेक विधायक उपक्रम राबवण्याचा घोषणाही करण्यात आल्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून १२ व्यांदा देशाला संबोधित केले आहे. दरम्यान, यंदा लाल किल्ल्यावरून सर्वात लांबलचक आणि रेकॉर्ड ब्रेक भाषण करण्याचा विक्रम पंतप्रधान मोदींच्या नावावर करण्यात आला आहे. या वर्षी पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित करताना लाल किल्ल्यावरून एकूण तब्बल १०३ मिनिटांचं भाषण दिले आहे. लाल किल्ल्यावरून कोणत्याही पंतप्रधानांनी आतापर्यंत एवढे मोठे भाषण दिले नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हा रेकॉर्डपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर करण्यात आलाय. यापूर्वी २०२४ मध्ये पंतप्रधान मोदींनी ९८ मिनिटांचे भाषण दिले होते. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी आज लाल किल्ल्यावरून १२ व्यांदा राष्ट्राला संबोधित करून इंदिरा गांधींचा विक्रम मोडला आहे अशाप्रकारे, पंतप्रधान मोदी जवाहरलाल नेहरूंनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्वातंत्र्य दिनानिमित देशात उत्साहाचे वातावरण होते.महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील एका शानदार कार्यक्रमात ध्वजारोहण केले तसेच राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये त्यात्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी ध्वजारोहण केले यावेळी स्वातंत्र्य संग्रामातील इतिहासाला उजाळा देण्यात आला.अनेक ठिकाणी विधायक तसेच संस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
