ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

पालिकेतील १३२अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदोन्नती वरून भाजपचा सेनेवर हल्ला


मुंबई/ शासकीय सेवेतील बदल्या आणि बडत्या हा सत्ताधाऱ्यांच्या कमाईचा विषय असतो.आणि राज्य सरकार मधील अधिकाऱ्यांची बदल्यांची प्रकरणे आजवर बरीच गाजली.सध्या पालिकेत सुधा अशाच एका प्रकरणावरून भाजप आक्रमक झाली असून या प्रकरणावरून भाजप नेते आशीष शेलार यांनी सेनेवर जोरदार हल्ला चडवला आहे.मुंबई महापालिकेतील एस सी,एस टी च्या १३२अधिकाऱ्यांच्या बदल्या का रखडवल्या जात आहेत मंत्रालय प्रमाणे इथेही काही वसुली केली जात आहे का असा थेट सवाल शेलार यांनी केला आहे.मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असताना अशा प्रकारे पालिकेतील अभियंते,अधिकारी यांना वेठीस धरून त्यांच्याकडून वसुली करणे हा एक मोठा भ्रष्टाचार आहे असे भाजपचे म्हणणे आहे.एस सी,एस टी च्या १३२ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीच्या प्रस्ताव स्थापत्य समितीत मंजूर झाला.पण चार सर्वसाधारण सभा होऊनही या प्रस्तावाला सताधरी शिवसेनेकडून मंजुरी मिळत नसल्याने ते १३२अधिकारी हवालदिल झालेत तर भाजपला या प्रकरणात वसुलीचा संशय येतोय त्यामुळे भाजपा या मुद्द्यावरून शिवसेनेची चांगलीच कोंडी करणार असे दिसतेय

error: Content is protected !!