[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

अति.आयुक्त श्रीमती आश्‍विनी भिडे यांचा बदल्या,बढत्या रॅकेटसला दणका – पालिकेतील बदल्या,बढत्या चे रॅकेटस उध्वस्त करण्याची गरज- एक अधिकारी त्याच मलईदार पदावर 30 वर्ष राहतोच कसा ?

मुंबई (किसन जाधव) महापालिकेची मुदत आता संपलेली असून मुंबईसह मुदत संपलेल्या सर्वच महापालिकांमध्ये प्रशासक आहे. अशावेळी मुंबई महापालिकेच्या बदल्या आणि बढत्यांमधले झोल हळू हळू उघडकीस येत आहेत. यात बड्या प्रशासकीय अधिकारी पासून अभियंते, लिपिक आणि शिपाई पर्यंत सर्वांनीच हात धुवून घेतले आहेत. पण पालिकेत जसे भ्रष्ट अधिकारी आहेत तसेच काही प्रमाणिक अधिकारी सुधा आहेत . आता याच प्रामाणिक वरिष्ठ अधिकार्‍यांमुळे एकाच ठिकाणी अनेक वर्ष ठाण मांडून बसलेल्याची उचलबांगडी होणार आहे. विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आश्‍विनी भिडे यांनी आपल्याच खात्यातील भ्रष्टाचाराची घान हटवला सुरुवात केली आहे आणि त्यांचे पहिले टारगेट ठरले आहे अनेक वर्ष नगर अभिंयता कार्यालयात ठाण मांडून बसलेल्या प्रशासकीय अधिकारी चित्रा पंडित, यांची बदली आदेश नुकताच काढून दणका दिला आहे
सूत्रानी दिलेल्या माहीतीनुसार जुलै 2021 मध्ये सहाय्यक अभियंता ते कार्यकारी अभियंता अशा 104 जणांना पदोन्नतीना नियुक्ती देण्यात आली होती.चित्र पंडित यांच्या कार्यकाळातील या नियुक्ती आता वादाच्या भोवर्‍यात सापडल्या आहेत. कारण काही जणांच्या नियुक्त्या त्यांच्या सोईनुसार देण्यात आल्याचे चर्चा आहे. कारण नगर अभियंता कार्यालयातील तत्कालीन नगर अभियंता पराग राऊत आणि संचालक साळवे यान जराही थांगपत्ता लागू न देता या बदल्या करण्यात आल्या समजते .त्यामुळे या बदल्यांबाबत तक्रारी यायला सुरुवात होताच या रॅकेट मध्ये सामील असलेल्या अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. या बदल्यांच्या प्रकरणाशी लागेबांधे असल्याची चर्चा होऊ लागल्यानं अश्‍विनी भिडे यांनी पदोन्नती, बदल्या स्वतःच्या नियंत्रणाखाली घेतल्या आहेत. परिणामी प्रशासकीय अधिकार्‍यांच्या सिंडिकेटला मोठा धक्का बसला आहे.
बदलीचा आदेश पारित आता कारवाईची जबाबदारी नगर अभिंयता अतुल पाटील याच्याकडे
सध्या सहाय्यक अभियंत्यांच्या अ गटातील बदल्या लॉटरी पद्धतीने काढून या बदल्या आणि पदोन्नती मध्ये पारदर्शकता आणण्याचे काम श्रीमती भिडे सुरू केले आहे तर या संपूर्ण प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या चित्र पंडित यांच्या हाती बदलीचा आदेश देत कारवाईला सुरूवात झाली आहे. दरम्यान बदली आदेश तर निघाला आहे. पण मागील वेळे प्रमाणे हा आदेश फक्त कागदावर राहता कामा नये तर तत्काळ यांची अमलबजावणी व्हायला हवी. अन्यथा ज्या अधिकार्‍यावर या बदली आदेशावर कारवाई करण्याची जबाबदारी आहे. त्याच्या विरोधात पालिका आयुक्त,नगर विकास मंती आणि वेळ पडल्यास न्यायालयातही जाण्याचा इशारा समाजिक संघटनानी दिला आहे.
शिपायांच्या बदल्यात घोळ
दरम्यान शिपायांच्या बदल्या करण्यात आल्या त्यात सुधा मोठा घोळ आहे 3/3/2022 रोजी ऑर्डर क्रमांक 20733/ए -3 नुसार प्रशासकीय अधिकारी यांनी शिपायांच्या बदल्या केल्या होत्या. यात चौकशी होणे गरजेचे आहे.
सर्व बदल्या आणि बढत्यांची प्रमुख अभिंयता (चौकशी) कडून चौकशी करावी
नगर अभियंता कार्यालयात मक्तेदार शिपाई आणि क्लार्क यांच्या अनेक वर्षांपासून बदल्या झाल्या नाहीत. त्यामुळे या सर्वांना मोक्याच्या ठिकाणी पोस्टिंग देण्यात आली आहे . यात सुधा घोटाळा झालेला आहे तेंव्हा श्रीमती आश्‍विनी भिडे यांनी या सर्व बदल्या आणि बढत्यांची प्रमुख अभिंयता (चौकशी) व टाहोकडून कडून चौकशी करावी आणि यात कोणाकोणाचे उखळ पांढरे झाले आहे. त्यांचा शोध घेऊन त्याची वसूली करणारे लिपिक आणि शिपाई आदी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
पुढील अंकी-

नगर अभिंयता कार्यालयातील मक्तेदार हेडक्लार्क, लिपिक आणि शिपाई याचे बदली धोरणाची एैशीतैशी वाचा

error: Content is protected !!