ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हे

पोलिसांकडून तीन जणांना ड्रग तस्करीत रंगेहाथ पकडले

ठाण्यातील मुंब्रा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून ड्रग्जची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर देखील मुंब्रा येथील खडी मशीन परिसरात काही जण एमडी ड्रग्सची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुप्ब्रा्ब्र्ब्रा्ब्््ब्र्ब्रा्ब् मुंब्रा पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच मुंब्रा पोलीस निरीक्षक हर्षल काळे यांनी अंमली पदार्थविरोधी पथकासह सापळा रचला आणि या प्रकरणात तीन जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांना बघून या तीन आरोपींनी पळ काढला. परंतु पोलिसांनी पाठलाग करून या तिघांना ताब्यात घेतले. पकडण्यात आलेले तीनही आरोपी मुंब्रा परिसरातील राहणारे आहेत. फिरोज खान (वय ३५), हिदायत अन्सारी (वय ४१), सय्यद नसीम आली उर्फ राजू (वय ४१) असे पकडलेल्या तस्करांची नावे आहेत.

error: Content is protected !!