ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानं मुंबईसह बॉलिवूडही हादरलं

मुंबई – अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास सुरु आहे. या घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांची मोठी यंत्रणा तपासाच्या कार्याला लागली आहे. या प्रकरणातील एका संशयित आरोपीची ओळख पटल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. गँगस्टर विशाल उर्फ कालू हा प्रमुख संशयित आरोपी असल्याची माहिती समोर येत आहे. काही महिन्यांपूर्वी रोहतकच्या गुरूग्राममधील एका स्क्रॅप डीलरवर अंधाधुंद फायरिंग केल्याचा आरोपी तो आहे. गोळीबार केल्यापासून विशाल फरार होता. विशाल हा गुरूग्रामचा रहिवाशी गँगस्टर रोहित गोदरासाठी काम करत असल्याची माहिती मिळत आहे
दरम्यान, सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानं मुंबईसह बॉलिवूडही हादरलंय. या घटनेवरुन विरोधक गृहखात्यावर निशाणा साधत आहेत आणि सत्ताधाऱ्यांनी याबाबत गंभीर दखल घेतलीय. सलमानची अतिरिक्त सुरक्षा दिली गेल्याचं म्हटलंय. मात्र सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे कोण होते? त्यांचा हेतू काय होता? यावरुन विविध चर्चा झडतायत. आम्ही सलमानला जीवे मारु शकतो, असा संदेश यातून द्यायचा होता? की मग आमच्या बंदुकीची गोळी सलमानच्या घरापर्यंत जावू शकते, हे हल्लेखोराला सांगायचं होतं? असे विविध तर्क लावले जात आहेत. सलमान खान मुंबईतल्या वांद्रेत राहतो. वांद्रेत गॅलेक्सी असं त्याच्या इमारतीचं नाव आहे.
स लमान खान गॅलेक्सी इमारतीच्या पहिला आणि दुसऱ्या मजल्यात राहतो. यापैकी पहिल्या माळ्यातल्या गॅलरीतून सलमान खान आपल्या चाहत्यांना अभिवादन करतो. त्याच गॅलरीवर गोळीबार झाला. एक गोळी ग्रीलच्या खालच्या बाजूला, दुसरी गोळी गॅलरीतल्या आतल्या भिंतीला, आणि तिसरी गोळी गॅलरीबाहेरच्या भिंतीला लागली. सलमान खान चाहत्यांना या गॅलरीतून अभिवादन करतो आणि नेमक्या त्याच गॅलरीच्या खाली एक आणि पाठिशी एक गोळ्या झाडण्यात आल्या.

error: Content is protected !!