ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीला ड्राय डेच रहाणार – दारू विक्रेत्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली


मुंबई/१४ एप्रिल ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती आहे हा दिवस ड्रायडे घोषित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये तसा निर्णय घेण्यात आल्याचे त्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे पण त्याविरुद्ध दारू फिक्रेत्याने मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करून या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी केली होती परंतु राज्य सरकारने याबाबत आपली बाजू न्यायालयात व्यवस्थित मांडल्यामुळे न्यायालयाने सरकारची बाजू योग्य असल्याचे सांगून बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी ड्राय डे घोषित करण्यात आला आहे तो योग्यच असल्याचे सांगितले व दारू विक्रेत्यांची याचिका फेटाळली त्यामुळे रविवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी दारू विक्रेत्यांना दारू विकण्यास सक्त मनाई असेल जर कुणी या निर्णयाच्या विरोधात जाऊन दारू विक्रीचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कठोर कारवाई होऊ शकते दारू विक्रेत्यांच्या याचिकेवर निकाल देताना उच्च न्यायालयाने दारू विक्रेत्यांना कडक शब्द सुनावले आहे महापुरुषांचा आदर करा असेही सांगितले आहे त्यामुळे 14 एप्रिल चा हा दिवस ड्राय डे असणार आहे

error: Content is protected !!