ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

टोलच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट – ठाणे पासिंग गाडयांना मुंबईत टोल माफ होणार

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलप्रश्नावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ठाणे पासिंग MH 04 च्या गाड्यांना मुंबईत टोल माफ करायचा विचार सुरु आहे, यासंदर्भात सविस्तर बैठक घेऊन लवकरच निर्णय घेऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना दिल्याची माहिती आहे. मात्र राज ठाकरे यांनी याबाबत अधिक बोलण्यास नकार दिला. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर शुक्रवारी 13 तारखेला राज ठाकरेंच्या घरी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीनंतर अधिक माहिती देऊ, असं राज ठाकरे म्हणाले.
‘मी तुम्हाला एकच वाक्य सांगणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली. परंतु या चर्चेनंतर त्याच्या निर्णयापर्यंत येणं याच्यासाठी म्हणून उद्या सकाळी वाजता माझ्या घरी बैठक आहे.त्या बैठकीत काय निर्णय होतो याबाबत मी पत्रकार परिषद घेऊन सांगेन. मुख्यमंत्री पूर्ण सकारात्मक आहेत.टोलबाबत कोणत्या गोष्टी होणार, काय निर्णय होणार हे मी उद्या सकाळी सांगेन. पोलिसांच्या घराबाबतही चर्चा झाली’, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.
MH 04 च्या गाड्यांना टोल माफ करायचा विचार सुरु आहे, यासंदर्भात सविस्तर बैठक घेऊन लवकरच निर्णय घेऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना दिल्याचं सांगण्यात येत आहे. १५ दिवस टोलनाक्यावर एमएसआरडीसी कडून टोलवर व्हिडीओग्राफी केली जाणार त्यात MH 04 च्या गाड्या किती येत जात आहेत यांचा आढावा घेणार त्यानंतर अहवाल सादर केला जाईल. वाशी टोलनाक्यासह इतर टोलनाक्यांवर सोयीसुविधांसाठी लवकरच एक समिती गठीत केली जाणार आहे. याबाबतची चर्चा राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात झाली. दरम्यान, टोल नाक्यांवर पिवळी लाईन गायब असल्याची कबुली एमएसआरडीसीने ने दिली.

error: Content is protected !!