[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
महापालिका

बापरे . . तिसऱ्या कोरोनाच्या लाटेसाठी 100 कोटींचा बाजार ?

मुंबई : मुंबईत कोवीडची तिसरी लाट येण्याची लांबची शक्यता नसताना  मुंबई महापालिका कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या  तयारीवर 100 कोटी रूपये खर्च करण्याची तयारी करत आहे. जम्बो कोविड केंद्रावर हा खर्च केला जाणार असून कोविड सेंटरमध्ये आयसीयू, ऑक्सिजन बेड्स, पेडियाट्रीक आयसीयू डायलिसीस आयसीयू सेवांसाठी खासगी रुग्णालयांची मदत घेतली जाणार आहे. 
विरोधकांनी मात्र यावरून सत्ताधारी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. पालिकेनं अगोदरच कोवीड संकटावर हजारो कोटी रूपयांचा खर्च केलेला आहे. लसीकरणामुळं आणि हर्ड इम्युनिटीमुळं तिसऱ्या लाटेचा मोठा धोका मुंबईला जाणवत नसल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळं कारण नसताना हा खर्च करू नये असं विरोधी पक्षनेते रवि राजा यांनी म्हटलं आहे. तर तिसरी लाट येणार असं गृहीत धरून ही तयारी केली जात असल्याचं शिवसेनेचे म्हणणं आहे.

महापालिकेच्या बीकेसी, दहिसर, सोमय्या मैदान, कांजूरमार्ग आणि मालाड या पाचही जंबो कोविड सेंटरमध्ये अतिदक्षता, ऑक्सिजन आणि विना ऑक्सिजन बेड्सचे तीन महिने अथवा कोविड- १९ चा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत, यापैकी जो कालावधी कमी असेल त्या कालावधीत व्यवस्थापन राखण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली .

error: Content is protected !!