ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

वसंत मोरेंचा मनसेला जय महाराष्ट्र


कात्रज – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करत असल्याचं जाहीर केलं आहे. सहनशक्तीचा कडेलोट झाल्याची भावना व्यक्त करत स्वपक्षियांनी त्रास दिल्याचा आरोप त्यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात केला आहे
माझी भूमिका मी दोन ते तीन दिवसांत मांडेन असे म्हणत कुणीही पक्षसंघटना सोडू नका असंही आवाहन मोरेंनी राजीनाम्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.
लोकांना आता मी नाटक करतोय का अशी शंका येऊ लागली आहे आणि यासाठी पुणे शहरातील कोअर कमिटी जबाबदार आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. ‘वारंवार एकनिष्ठतेवर संशय घेतला जात असेल, सांगूनही माझ्यावरच कारवाया होत असतील तर मी हतबल आहे. मी लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं बोललो होतो. पण, पुण्यात लोकसभा लढण्यासाठी नकारात्मक वातावरण असून आपण लढू शकत नाही असा अहवाल पाठवले जात आहेत, असेही मोरे म्हणाल
मागील आठवड्यात कात्रज डेअरीच्या आरक्षित जागेसंदर्भातील मुद्दा पुढे करत मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली होती. तेंव्हापासूनच मोरे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर त्यांनी मनसेचा राजीनामा दिला आहे.

error: Content is protected !!