ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

दादरच्या टिळक ब्रीज खाली घाणीचे साम्राज्य हीच का सेनेची सुंदर आणि स्वच्छ मुंबई?- बाबूभाई भवानजी

       *मुंबई/ दादरची हिंदू कॉलनी मुंबईच्या इतिहासाची एक मोठी साक्षीदार आणि मध्य मुंबईचा लेंड मार्क आहे मात्र इथल्या टिळक ब्रिजचा खाली आणि हिंदू कॉलनी परिसरातील फुटपाथ वर झालेले अतिक्रमण आणि फुटपाथवर वास्तव्य करणाऱ्या लोकांकडून या परिसरात एवढी घान केली जाते की इथून जाताना नाक मुठीत धरून जावे लागते सुंदर मुंबई स्वच्छ मुंबई असा नारा देणाऱ्या पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेची हीच का सुन्दर आणि स्वच्छ मुंबई असा संतप्त सवाल मुंबईचे माजी उप महापौर आणि भाजपा नेते बाबूभाई भवानजी यांनी केला आहे*
 *दादर हे मुंबईचे हृदय आहे.शिवाय याच भागात घटनाकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने पावन झालेले इतिहासिक राजगृह आहे.शिवाय हिंदू कॉलनी आहे .या भागात सगळे सुसंस्कृत आणि मोठ मोठ्या क्षेत्रात काम करणारे लोक राहतात शिवाय संपूर्ण देशातील सर्व राज्यांना जोडणारे दादर हे मोठे स्टेशन या भागात आहे .मात्र दादर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा जो टिळक ब्रीज आहे त्यावरून रेल्वे प्रवासी किंवा पुलावरून जाणारे इतर लोक जेंव्हा खाली उतरतात तेंव्हा पुलाच्या खाली असलेल्या दुर्गंधीने त्यांना ओकारी ( ओमेट) येते एवढी घाण आणि दुर्गंधी पुलाच्या खाली आहे कारण फुटपाथवर अतिक्रमण झाले असून तिथे छोट्या छोट्या झोपड्या बांधल्या आहेत तर काही लोक तिथे उघड्यावरच राहतात आणि तिथेच खरकटे पाणी आणि घाण टाकतात याबाबत पालिकेला तक्रार केली तर ते पोलिसांकडे बोट दाखवतात तर पोलिसांकडे तक्रार केली तर ते पालिकेकडे बोट दाखवतात मग इथल्या लोकांनी तक्रार तरी कोणाकडे करायची हा परिसर भारतात आहे की पाकिस्तानात हे एकदा महापालिका आणि सत्ताधारी शिवसेनेने सांगून टाकावे .उठसूट न्यूज चॅनलच्या कॅमेरा समोर येऊन मोठमोठ्या बाता मारणाऱ्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कधीतरी टिळक ब्रीज खाली येऊन तिथे अर्धा तास थांबून दाखवावे आणि खरोखरच मुंबई सुंदर आणि स्वच्छ आहे का हे प्रामाणिक पणाने सांगावे अशा शब्दात  भवानजी यानी आपला संताप व्यक्त केला आहे*
error: Content is protected !!