ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

पालिकेने केला १०० कोटींचा कोविड कॉट्रॅक्ट घोटाळा-सोमय्या


मुंबई/ शिवसेना नेत्यांनी एकापाठोपाठ एक घोटाळे उघडकीस आणणाऱ्या किरीट सोमय्या यांनी आत पुन्हा एकदा मुंबई महापालिकेला टार्गेट करण्याचे ठरवले आहे.त्यांनी कोवििळ काळात पालिकेच्या कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी मिळून केलेला १०० कोटींचा घोटाळा लवकरच उघडकीस आणणार असल्याचे सांगितले आहे
डोंबिवलीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना त्यांनी सांगितले की परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित एका कंत्राटदाराने कंत्राटात तब्बल १०० कोटींचा घोटाळा केला आहे आणि तो आपण पुराव्यासह उघडकीस आणणार आहे.सोमय्या यांच्या या आरोपामुळे पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे.किरीट सोमय्या मुळे सेनेचे प्रताप सरनाईक,आनंदराव अडसूळ,भावना गवळी,अर्जुन खोतकर हे नेते अडचणीत आले आहेत त्यात आता मुंबई महापालिकेतील नव्या १०० कोटींच्या घोटाळ्यामुळे आणखी कोण अडचणीत येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

error: Content is protected !!