ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

हॉटेल,रेस्टॉरंट,बार उघडायला परवानगी मग मंदिरच बंद का?-बाबूभाई भवानजी

हॉटेल,रेस्टॉरंट,बार उघडायला परवानगी मग मंदिरच बंद. का?/बाबूभाई भवानजी
मुंबई/ पृथ्वीवरील जीव सृष्टी आणि संपूर्ण निसर्ग ही साक्षात परमेश्वराची देणं आंहे.म्हणूनच माणसाची त्याच्यावर श्रद्धा आहे आणि याच श्रधेपोटी माणूस देवाच्या चरणी लीन होतो मंदिरात जाऊन देवाची पूजा करतो.आज जे कुणी सरकार मध्ये बसले आहेत ते सुधा देवाच्याच कृपेने तिथवर पोचले पण सत्ता मिळताच त्यांना देवाचा आणि आपल्या हिंदू संस्कृतीचा विसर पडलाय आणि म्हणूनच त्यांनी कोरोंनाची भीती दाखवून देवाची मंदिरे सुधा बंद केलीत हा कोट्यवधी भाविकांवर अन्याय असून जर तुम्ही दुकाने ,हॉटेल्स,रेस्टॉरंट,मॉल्स यांना परवानगी देता तर इश्र्वरणेच काय तुमचे घोडे मारले मंदिरे उघडण्यास का परवानगी देत नाही असा थेट सवाल माझी उपमहापौर आणि भाजपा नेते बाबूभाई भवानजी यांनी केला आहे त्याच बरोबर कधीकाळी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नावारूपाला आलेली आणि सतेपर्यंत पोचलेल्या शिवसेनेला आता मात्र हिंदुत्वाचा आणि आणि आपल्या थोर धार्मिक परंपरेचा विसर पडलेला आहे असा आरोपही त्यांनी केला आहे तसेच मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या दौर्‍यातील गर्दी चालते पण लोकल ट्रेन आणि मंदिरातील गर्दी चालत नाही हा कुठला न्याय तेंव्हा मंदिराचे दरवाजे उघडा अन्यथा देवाचे करोडो भक्त रस्त्यावर उतरून तुमचे सतेचे दरवाजे बंद करतील असा इशाराही दिलाय

error: Content is protected !!