ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

यापुढे पाकिस्तानची गय केली जाणार नाही भारताचा इशारा

नवी दिल्ली भारत-पाकिस्तानमध्ये सलग ८६ तास युद्ध चालल्यानंतर अखेर युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतरही पाकिस्तानकडून अद्यापही कुरापती सुरुच असल्याचे चित्र पाहाला मिळत आहे. अशातच आता भारताकडून एक मोठी घोषणा करण्यात आली. पाकिस्तानातून जर गोळी चालली तर भारतातून गोळे चालणार असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला ललकारले. मागील आठवडाभरातील तिसरी उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीनंतर मोदींनी पाकिस्तानला ललकारले.
पाकिस्तान जर दहशतवाद्यांना आमच्या ताब्यात देणार असतील तर आम्ही पुढील चर्चा करण्यास तयार आहे. आम्ही दुसऱ्या कोणत्याही विषयावर चर्चा करण्यास तयार नाही. आम्हाला कोणाच्याही मध्यस्थीची गरज नसल्याचे मोदींनी स्पष्ट केले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान यांच्यातील वादग्रस्त काश्मीर मुद्द्यात मध्यस्थीची तयार दर्शवली. मात्र भारत सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली. आम्हाला कोणत्याही मध्यस्थीची गरज नाही. पाकव्याप्त काश्मीर याच मुद्द्यावर पाकिस्तानशी चर्चा होऊ शकते

error: Content is protected !!