ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

भाजपकडून शिवसेनेला मोठी चपराक-पोलीस बंदोबस्त झुगारून सोमय्याचा सत्कार


पुणे/ पुण्यात शिवसैनिकांच्या धक्काबुक्की मध्ये ज्या पायरीवर पाडून सोमय्या जखमी झाले होते त्याच पायरीवर काल भाजपने पोलीस बंदोबस्त झुगारून सोमय्या यांचा सत्कार केला शिवसेनेला ही एक चपराक म्हणावी लागेल.
आठ दिवसांपूर्वी सोमय्या संजय राऊत यांच्या भ्रष्टाचाराची तक्रार करण्यासाठी पुण्यात आले होते.यावेळी पालिका आयुक्तांना भेटायला जाताना काही शिवसैनिक त्यांच्याकडे निवेदन घेवून गेले मात्र त्यांनी ते स्वीकारले नाही त्यामुळे शिवसैनिकांनी त्यांना धक्का बुकी केली यात ते पालिका प्रवेशद्वाराच्या पायरीवर पाडून जखमी झाले
या प्रकरणी ६० शिवसनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि केंद्रीय गृह विभागाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू झालीय ज्या पायरीवरून सोमय्या पडले त्याच पायरीवर त्यांचा सत्कार करण्याचा भाजपने निर्णय घेतला होता मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली आणि सोमाय्यंचा सत्कार हॉल मध्ये करा असे सांगितले .पण भाजपा कार्यकर्ते हट्टाला पेटले याच दरम्यान दुपारी सोमय्या पालिका परिसरात येताच पोलिसांनी त्यांना अडवले त्यामुळे ते गाडी घेऊन बाहेर गेले या घटनेमुळे भाजपा कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी हंगाम सुरू केला तोवर सोमय्या चालत पालिकेच्या गेटवर असेल आणि मला पालिका आयुक्तांना भेटायचे आहे आता जाऊद्या सांगू लागले त्यानंतर गेट उघडण्यात आले तसे सर्व भाजपा कार्यकर्ते पोलिसांचा बंदोबस्त तोडून आत घुसले आणि शिवसेना व महाविकास आघाडी सरकारच्या विरुद्ध घोषणा देऊ लागले तोवर किरीट सोमय्या पालिका आयुक्तांना भेटून आले त्यानंतर भाजपचे शहर अध्यक्ष मुळीक यांच्या हस्ते त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला त्यानंतर सोमय्या पत्रकारांशी बोलताना म्हणाले की उदव ठाकरे यांच्या गुंडांनी मला ठार मारण्याचा प्रयत्न केला पण मी घाबरणार नाही यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणारच कोविद् सेंटर चे कंत्राट ज्या चार ज्यांना दिले त्यात चार पार्टनर असून त्यापाकी एक के ई एम जवळचा चहावाला आहे आणि त्या सर्वांची चौकशी व्हायला हवी असे ते म्हणाले.

सोमय्यांचा सत्कार झालेल्या पायरीचे काँग्रेस कडून गोमुत्राने शुद्धीकरण

आज भाजपने पुणे महापालिकेच्या ज्या पायरीवर किरीट सोमय्या यांचा सत्कार केला होता. त्या पायरीचे कॉंग्रेसने गोमुत्र शिंपडून शुद्धीकरण केले .भाजपचे कार्यकर्ते पालिका परिसरातून गेल्यावर कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष रमेश बागवे आपल्या कार्यकर्त्यांसह तेथे आले आणि त्यांनी त्या पायऱ्यांवर गोमुत्र शिपाडून त्या पायऱ्या पुसून घेतल्या आणि पायऱ्यांचे शुद्धीकरण केले

error: Content is protected !!