ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

सोलापुरात संजय राऊतांच्या गाडीवर चप्पलफेक


सोलापूर : सोलापुरात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या गाडीवर अज्ञांतांकडून चप्पलफेक करण्यात आली आहे. सोलापुरातील बाळे येथे एका हॉटेलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी संजय राऊत आले होते. त्यावेळी परत जात असताना राऊतांच्या गाडीवर चप्पलफेक करण्यात आली. राऊतांच्या गाडीवर चप्पलने भरलेली पिशवी फेकण्यात आली होती. दरम्यान यावेळी या प्रकारानंतर

घोषणा देऊन कार्यकर्ते पसार झालेत. सध्या या कार्यकर्त्यांचा शोध पोलीस आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते घेत आहे. तर सुषमा अंधारे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न झाला
नियोजित कार्यक्रमांसाठी संजय राऊत हे रविवार 10 डिसेंबर रोजी दिवसभर सोलापूर दौऱ्यावर होते. त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर – पुणे राष्ट्रीय महामार्गाजवळ असेलल्या बाळे या गावात संजय राऊत एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यावेळी पुन्हा माघारी फिरत असताना आणि सोलापूर शहराच्या दिशेने जात असताना राऊतांच्या गाडीवर चप्पलेची पिशवी फेकण्यात आली. पुलावरुन एका अज्ञात कार्यकर्त्याने ही पिशवी राऊतांच्या गाडीवर फेकली.त्यामुळे एकाच खळबळ माजली आहे.

error: Content is protected !!