[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्रमुंबई

अवमान याचिकेवरील सुनावणी सोमवारी एस टी कामगारांचा संप सुरूच राहणार

मुंबई/ न्यायालयाच्या आदेशानंतरही एस टी कामगारांनी संप सुरूच ठेवल्याने राज्य परिवहन महामंडळाने संपकरी कर्मचाऱ्यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली आहे . मात्र त्यावरील सूनवणींबई उच्च न्यायालयाने सोमवार पर्यंत पुढे ढकलली आहे .दरम्यान काल राज्याच्या वेग वेगळ्या भागातून असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात आंदोलन केले .त्यांना मंत्रालयावर मोर्चा काढायचा होता पण पोलिसांनी परवानगी नाकारली . यावेळी मोर्चात सामील झालेल्या भाजप नेत्यांनी आणि एस टी कामगारांनी सरकार विरुद्ध घोषणा देत जोवर विलीनीकरण होत नाही तोवर परतणार नाही अशा घोषणा दिल्या . दरम्यान सायंकाळी कृती समिती व परिवहन मंत्री यांच्यात बैठक झाली पण त्यातून तोडगा निघाला नाही त्यामुळे संप सुरूच राहणार आहे .

error: Content is protected !!