ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

म्हाडा कायद्यातील सुधारणा विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळावी यासाठी स्वाक्षरी मोहीम

मुंबई/ प्रत्येक पावसाळ्यात मुंबईत मोडकळीस आलेल्या कुठल्या ना कुठल्या इमारती कोसळून त्यात जीवित हनी होते त्यामुळे मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींना प्रश्न गंभीर बनला आहे मुंबईत मोडकळीस आलेल्या १५हजार उपकार प्राप्त इमारतीच्या पुनर्विकासाच्या संदर्भात म्हाडा कायद्यात सुधारणा करणारे एक विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर केले होते .सादर विधेयक राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवलेले आहे मात्र ८ महिने उलटून गेले तरी त्याला राष्ट्रपतींची मंजुरी मिळालेली नाही त्यामुळे मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रकल्प रेंगाळला आहे त्यासाठीच शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी राष्टपती याबाबत पोस्ट कार्डाच्या द्वारे नागरिकांच्या सह्यांची मोहीम हाती घेतली होती त्यासाठी परळ ‘लालबाग ,शिवडी, .करिरोड, एल्फिन्स्टन, भोईवाडा अभ्युदय नगर आदी सात ठिकाणी ही सह्यांची मोहीम ८ नोव्हेंबर रोजी राबवण्यात आली तिला जनतेकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आणि लाखो लोकांनी सह्या केल्या त्यामुळे एवढ्या प्रंचड संख्येने सह्या करणाऱ्यांची लोकभावना विचारात घेऊन आता तरी राष्ट्रपती या विधेयकावर सही करून मंजुरी देतील असा विश्वास मुंबईकरांनी व्यक्त केलाय .

या स्वाक्षरी मोहिमेस महापौर किशोरी पेडणेकर , शिवसेना उपनेते खासदार अरविंद सावंत , पश्चिम महाराष्ट्र समन्वयक दगडू दादा सकपाळ ,विभाग प्रमुख बेस्ट समितीचे  अध्यक्ष  आशिष चेंबूरकर ,विधानसभा संघटक सुधीर साळवी ,उपविभाग प्रमुख गजानन चव्हाण , विभागातील सर्व नगरसेवक ,शाखाप्रमुख ,म शाखा संघटक ,पदाधिकारी ,शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते 

error: Content is protected !!