ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

हिम्मत असेल तर कुडाळ मधून पुन्हा विधानसभेची निवडणूक लढवून दाखवा

विनायक राऊत यांचे नारायण राणेंना जाहीर आव्हान

सिंधुदुर्ग – राणे आणि शिवसेना यांच्यातील संगर्ष दिवसेंदिवस वाढत चालला असून दोन्हीकडून एकमेकांना आव्हान प्रती आव्हाने देण्याची जणू काही स्पर्धाच लागलेली आहे .प्रकरणावरून नारायण रणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यानंतर सिंधुदुर्ग नागरी येथील एका जाहीर कार्यक्रमात सेनेचे खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर हल्ला करताना रानेंमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून पुन्हा निवडणूक लढवून दाखवावी .त्यांची अनामत जप्त केली नाही तर नाव लावणार नाही असे जाहीर आव्हान विनायक राऊत यांनी केले आहे .त्यामुळे शिवसेना आणि राणे समर्थक यांच्यात पुन्हा एकदा तणाव निर्माण होणार आहे
सिंधदुर्ग नागरी येथील कार्यक्रमात बोलताना विनायक राऊत म्हणाले कि राणे आणि त्यांच्या मुलांना येथील जनतेने अनेक वेळा पराभूत केले आहे दोनदा त्यांच्या पोरांना तर एकदा दस्तुरखुद्द राणेंना आपटलाय त्यामुळे राणे सारख्यांची यापुढे सिंधुदुर्गात डाळ शिजणार नाही .मात्र दिल्लीकरण खुश करण्यासाठी आणि खास करून मोदी व अमित शहा य्यांची मर्जी राखण्यासाठी राणे शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करीत आहेत असेही राऊत यांनी सांगितले .इतकेच नाही तर ते पुढे असेही म्हणाले कि आजच नाही तर भविष्यात कधीही शिवसेनेच्या अंगावर आलात तर मर्द शिवसैनिक त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही राणेंना दिलाय .

राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेपासून चिपी विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्य पर्यंत सेना आणि राणे यांच्यातील आरोप प्रत्यारोपांचा हा कलगीतुरा यापुढेही असाच सुरु राहणार असल्याची चिन्ह दिसत असल्याने यातून कधीतरी मोठी राडेबाजी होण्याची भीती कोकणात व्यक्त केली जात आहे .

error: Content is protected !!