[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
गुन्हेमहाराष्ट्र

भिवंडीत मस्करीत ‘ये लंबू’ म्हणणे बेतले मित्राच्या जीवावर ; चाकूने भोसकून भररस्त्यात मित्राची हत्या..

 भिवंडी दि 10 =-मित्रांमध्ये मस्करी सुरु असतानाच ‘ये लंबू’ म्हणणे एका मित्राच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे लंबू म्हणताच आरोपी मित्राने चाकूने भोसकून भररस्त्यातच मित्राची  हत्या केली. ही घटना भिवंडीतील नुरीनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करीत पोलिसांनी ३ आरोपींना ताब्यात घेतले आहे.  समीर शेख (वय, २१ रा, आजाद नगर, भिवंडी  ) या मुख्य आरोपीसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांचा एक साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. तर मोहंमद अजगर शेख उर्फ सन्नाटा (वय २०, नुरीनगर, भिवंडी ) असे हत्या झालेल्या मित्राचे नाव आहे….
मृतक मोहंमद अजगर हा कुटूंबासह भिवंडीतील नुरी नगर परिसरात राहतो. काही दिवसापूर्वी मृतक व आरोपी समीर मध्ये काही कारणावरून वाद होऊन भांडण झाले होते. त्यातच काल रात्रीच्या सुमारास मृतक मोहंमद अजगर याने आरोपी समीर ये  लंबू म्हणून जोराने आवाज दिला. यावरून दोघांमध्ये वाद होऊन झटापटी झाली. त्यावेळी आरोपीसह त्याच्या साथीदारांनी भर रस्त्यातच मृतक मोहंमद अजगरला मारहाण करीत त्याच्यावर धारदार चाकूने वार केले. हि घटना पाहून परिसरातील जमावाने आरोपी समीरला पकडून जबर मारहाण केली. जमावाच्या मारहाणीत आरोपी  समीरही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मुंबईच्या सायन रुग्णालयात उपचार सुरु आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनेचे गांभीर्य पाहता परिससरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला. या घटनेचा आज गुन्हा दाखल करून अधिक तपास पोलीस अधिकारी नितीन पाटील करीत आहेत…

error: Content is protected !!