ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
मनोरंजनमुंबई

रंगकर्मींचे आंदोलन


रंगभुमीला चालना मिळावी म्हणून आज रंगकर्मींनी मुंबईमध्ये परळ येथे दादासाहेब फाळके पुतळ्याजवळ आंदोलन केले. करोनामुळे अनेक कलाकारांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणुन रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्र यांच्यातर्फे आज राज्यभरातील लोककलावंत तंत्रज्ञ लावणी कलावंत भारूड कलावंत या निमित्ताने एकत्र आले होते. रंगकर्मींनी आपल्या मागण्यांचे निवेदन यापुर्वीच सरकारला दिले होते पण काहीच कृती न झाल्याने हे आंदोलन करण्याचे निर्णय घेण्याचे व्यासपिठाकडून सांगण्यात आले. सध्या करोनाची स्थिती कमी झाल्यामुळे रंगभुमी, चित्रपटसृष्टी, वांद्यवृंद पुन्हा सुरळीत करण्यासाठी या आंदोलनाचा प्रमुख हेतु आहे. असे सुप्रसिद्ध कलाकार विजय पाटकर यांनी स्पष्ट केले. नियम व अटी घालून कलाकारांना सोसायटीच्या आवारात, मोकळ्या जागेत, मैदानात आपली कला सादर करण्यास परवानगी देण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली. करोनामुळे घरभाडे, विजेचे बिल, लोकल प्रवास हे प्रश्नसुद्धा अडचणीचे ठरत आहेत. राज्यातील सर्व रंगकर्मींना दरमहा ५ हजाराचा उदरनिर्वाह भत्ता मिळावा अशी ही मागणी करण्यात आली आहे.
या आंदोलनात अनेक कलाकारांनी शांत व शिस्तबद्ध पद्धतीने आपल्या लोककला सादर केल्या. यानंतर पोलिसांनी यातील काही कलाकारांना भोईवाडा पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले
.तेव्हा सर्व कलाकारांनी पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केले. कलाकारांपैकी काही प्रतिनिधी सांस्कृतिक कार्य संचालयनात गेले. जोवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री यापैकी कोणीही आम्हाला भेट देत नाही. तोवर हे ठिय्या आंदोलन असेच चालु राहिल असे विजय पाटकर यांनी सांगितले. याप्रसंगी रंगकर्मी आंदोलनात भाग घेणाऱ्यांपैकी सुप्रसिद्ध कलाकार श्री. विजय पाटकर लावणी कलावंत मेघा घाडगे, विनायक गिरकर, संचीत यादव, विजय राणे, शितल माने, अमिता नाईक, सचिन पाताडे, श्याम भगत, गोविंद हडकर, संतोष परब, राजु शेरवाडे, प्रशांत भाटकर सदर प्रसंगी उपस्थित होते. हे आंदोलन अत्यंत शांतता आणि शिस्तबद्ध पद्धतीने करणाऱ्यात आले.

error: Content is protected !!