ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

मलिक विरुद्धच्या मोर्चात भाजप नेत्यांना अटक व सुटका


मुंबई/ सध्या ई डी च्या अटकेत असलेले अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने तीव्र आंदोलन सुरू केले आहे. काल आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा दरम्यान भाजपने मोर्चा काढला होता तसेच जोवर मलिक राजीनामा देत नाही तोवर विधिमंडळाचे कामकाज चालू देणार नाही असा इशाराही भाजपने दिला आहे
नवाब मलिक यांच्यावर मनी लंद्रिंग प्रकरणी ई डी ने गुन्हा दाखल केला असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.त्यामुळे भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे मलिक यांनी बॉम्बफोटातील आरोपी शहवाली खान याच्याकडून कुर्ला येथील गोवेवळा कंपाऊंड मधील जमीन s2astat विकत घेतली आणि जमिनीच्या या व्यवहारात दाऊदची बहीण हसीना पारकर आणि तिचा वाहन चालक सलीम पटेल हे सहभागी होते असा आरोप फडणवीस यांनी केला असून त्यासाठीच नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावीशी मागणी आहे आणि या मागणीसाठी भाजपने तीव्र आंदोलन सुरू केले आहे काल महाराष्ट्रातील भाजपचे हजारो कार्यकर्ते मुंबईत जमले आणि त्यांनी आझाद मैदान ते मेट्रो सिनेमापर्यंत मोर्चा कालं यावेळी महाविकास आघाडी सरकार आणि नवाब मलिक यांच्या विरुद्ध घोषणा देण्यात आल्या तसेच विधानसभेचे कामकाज चालू न देण्याचा इशाराही देण्यात आला आहे
बॉक्स
मालिकांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही/ शरद पवार
भाजपने किती मलिक यांच्या राजीनाम्यासाठी किती जरी आंदोलने केली तरी नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जाणार नाही त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले तसेच फडणवीस यांनी दिलेल्या व्हिडिओत जी 125 मिनिटांची रेकॉर्डिंग आहे त्याबद्दल सुधा तीव्र नाराजी व्यक्त केली

error: Content is protected !!