ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

आज मानापमान नाट्यात चिपीचे लोकार्पण; पद मोठे पण पत्रिकेवर नाव छोटे राणे नाराज


ठाकरे राणे एकाच व्यासपीठावर
सावंतवाडी- आज कोकणातील बहुचर्चित चिपी लोकार्पण होत असून त्या निमित्ताने एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार आहेत त्यामुळे दोघांच्याही समर्थकांमध्ये काही राडेबाजी होऊ नये म्हणून विमानतळ परिसरात प्रंचड फौजफाटा तैनात करण्यात आला आहे
कोकणातील चिपी येथे २७४ हेक्टर जागेवर हा विमानतळ बांधण्यात आला असून विमानतळाची धावपट्टी ६० मीटर रुंद तर लांबी २.५ किमी आहे शिवाय १०हजार चौरस मीटरचा टर्मिनल आहे या विमानतळावर १८० प्रवासी क्षमतेची विमाने उतरू शकतात कोकणातील पर्यटन विकासातील एक महत्वाचा टप्पा म्हणून या विमानतळाकडे पाहिले जात असून एस टी ने जिथे कोकणात जायला ९ तास लागायचे तिथे आता या विमानाने फक्त दीड तासात मुंबई कोकणचा प्रवास करता येणार आहे .
आज या विमानतळाचा लोकार्पण सोहळा असून त्यासाठी छापलेल्या निमंत्रण पत्रिकेवर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि मुख्यमंत्री ठाकरे यांची नावे मोठ्या अक्षरात तर नारायण रणे यांचे नाव छोट्या अक्षरात असल्याने ते नाराज झाले आहेत .या कार्यक्रमासाठी सेना भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने चिपी येथे जमणार असल्याने त्यांच्यात घोषणायुद्ध आणि राडेबाजी होण्याची शक्यता आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्वव ठाकरे आणि नारायण राणे . एकाच व्यासपीठावर येणार असल्याने ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे

बॉक्स/ सेना भाजप मध्ये श्रेय वादाची लढाई
व चिपी विमानतळावरून सेना भाजयात श्रेयाची लढाई सुरू असून हा विमानतळ आपल्यामुळेच झाला असे राणे आणि त्यांचे समर्थक सांगत आहेत तर हा विमानतळ आमच्याच प्रयत्नाने झाला असे शिवसेना सांगत आहेत त्यामुळे तणावाचे वातावरण आहे ठाकरे राणे यांच्यातील वाद इतका तीव्र आहे की दोन्ही नेत्यांनी एका विमानाने जाण्याचे टाळले त्यामुळे दोघेही दोन वेगवेगळ्या विमानाने जाणार आहेत .

error: Content is protected !!