अखेर पहेलगाम हल्ल्याचा भारताने बदला घेतला – पाकिस्तानातल्या नऊ दहशतवादी तळांवर हल्ला 120 दहशतवादी ठार
लाहोर/ पहलगाम हल्ल्यात २७ निरपराध पर्यटकांचा बळी घेणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा अखेर भारताने बदला घेतला. मंगळवारी मध्यरात्री १ ते १.२५ दरम्यान भारतीय हवाई दलाने पी ओ के आणि पाकच्या पंजाब प्रांतातील ९ दहशतवादी तळांवर हल्ले केले या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले असून अनेकजण दहशतवादी गंभीर जखमी झाले आहेत.पाकिस्तानला हा फार मोठा झटका आहे.संपूर्ण जगाने या कारवाईचे समर्थन केले आहे.काही दिवसांपूर्वी मोठमोठ्या वल्गना करणारे पाकिस्तानी नेत्यांचे आता मात्र भीतीने तोंड बंद झाले आहे.
तब्बल २ आठवड्यांनी भारताने बदला घेतला .आणि पाकिस्तानात घुसून दहशतवादी ९ तळांवर हल्ले केले . यामध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत. भारताची ही प्रत्युत्तरात्मक कारवाई पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर करण्यात आली आहे. आणि त्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले आहे. हे नाव त्या महिलांना समर्पित आहे ज्यांचे पती २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी मारले होते., कॅबिनेट बैठकीत पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूरसाठी तिन्ही सैन्यांचे कौतुक केले. ऑपरेशन सिंदूरबद्दल त्यांनी सांगितले की हा नवा भारत आहे. संपूर्ण देश आपल्याकडे पाहत होता. हे घडणे अपरिहार्य होते.पाकच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स चे संचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी म्हणाले की, भारताने २४ क्षेपणास्त्रे डागली आहेत., पंतप्रधान मोदी रात्रभर ऑपरेशन सिंदूरवर लक्ष ठेवून होते.
मंगळवारी १ ते.२५ वाजताच्या दरम्यान भारतीय हवाई दलाची राफेल आणि सुखोई आकाशात झेपावली आणि पी ओ के व पंजाब प्रांतातील अतिरेक्यांच्या तळावर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. पीओकेमधील मुझफ्फराबाद येथील लष्करच्या सवाई नाला प्रशिक्षण केंद्राला प्रथम लक्ष्य करण्यात आले. सोनमर्ग, गुलमर्ग आणि पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांनी येथे प्रशिक्षण घेतले.
मुझफ्फराबादचे सय्यदना बिलाल कॅम्प. येथे शस्त्रे, स्फोटके आणि जंगलात टिकून राहण्याचे प्रशिक्षण दिले जात असे.
कोटली येथील लष्कराची गुरपूर छावणी. २०२३ मध्ये पूंछमध्ये यात्रेकरूंवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना येथे प्रशिक्षण देण्यात आले होते.
भिंबरचा बर्नाला कॅम्प. येथे शस्त्रे कशी वापरायची हे शिकवले जाते.कोटली येथील अब्बास कॅम्प. ते नियंत्रण रेषेपासून १३ किमी अंतरावर आहे. आत्मघातकी हल्लेखोर तयार आहेत.
सियालकोटचा सरजल कॅम्प. मार्च २०२५ मध्ये पोलिस कर्मचाऱ्यांना मारणाऱ्या दहशतवाद्यांना येथे प्रशिक्षण देण्यात आले होते.तसेच लष्कर ए तोयबाचे मुजफ्फराबाद येथील सवाई नाला कँप, बर्नालायेथे असलेले मरकज आहले हदिस कँप,जेशचा सय्यद बिलाल कॅम्प, आदी ९ कॅम्पवर हल्ले करण्यात आले या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले पाकिस्तानने मात्र २६ जण ठार आणि ३८ जण जखमी झाल्याचे म्हटले आहे.
या हल्ल्यामुळे पाकिस्तानला कुठेतरी धडा शिकवण्याची भावना भारतीय जनतेत आहे या हल्ल्यानंतर भारताने भारताने खबरदारीचा उपाय म्हणून भारत पाक सीमेवरील ९ विमानतळ १० तारखेपर्यंत बंद ठेवले आहेत तसेच जम्मू काश्मीर मधील सर्व शाळा कॉलेजना सुट्टी देण्यात आली आहे.
***
अझर मसूदच्या कुटुंबातील १४ ठार
जैश ए मोहम्मदचा म्होरक्या कंधार विमान अपहरणाचा मास्टर माईंड अझर मसूद याच्या घरावर केलेल्या हल्ल्यात त्याचा भाऊ,बहीण,भाचा आदी १४ जण ठार झाले त्यानंतर हताश झालेल्या अझरने म्हटले आहे की या हल्ल्यात मी मेलो असतो तर बरे झाले असते . या हल्ल्याने अझर मसूद आणि त्याच्या जेश ए मोहम्मद संघटनेला मोठा धक्का बसला आहे.
