[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
गुन्हेमुंबई

१३वर्षाच्या मुलीवर६रिक्षा चालक व २ रेल्वे कामगारांचा सामूहिक बलात्कार


पुणे/ महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून पुण्यात एका १३वर्षाच्या मुलीवर ६रिक्षाचालक आणि २रेल्वे कर्मचाऱ्यांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे .सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पिढीत मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत
एक १३वर्षाची मुलगी३१ऑगस्टला पुणे रेल्वे स्थानकात तिच्या मित्राला न्यायला आली होती पण तो आला नाही त्यामुळे परत जाण्यासाठी तिने रिक्षा केली मात्र रिक्षा चालकाने तिला वानवडी येथे नेले आणि आपल्या पाच मित्रांना बोलून घेतले व तिच्यावर सामूहिक बलात्कार केला त्यानंतर तिला तिथेच दोन दिवस ठेवले आणि रेल्वे कर्मचारी असलेल्या आणखी दोन मित्रांना बोलावले अशा तऱ्हेने सर्वांनी मिळून तिच्या अब्रू वर दरोडा घातला .मात्र पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पिढीत मुळीलाताब्यात घेतले तसेच तिने दिलेल्या माहितीवरून सर्व आरोपींना अटक केली आहे

error: Content is protected !!