[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

बंगळुरू चेंगराचींगरी ! पोलीस आयुक्तांसह ६ पोलिस निलंबित – आरसीबीच्या ४ पदाधिकाऱ्यांना अटक

मुंबई : बंगळुरू चेंगराचेंगरीसंबंधी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी मोठा निर्णय घेतला आहे. बंगळुरू शहराच्या पोलिस आयुक्तांना त्यांनी निलंबित केलं आहे. तसेच अतिरिक्त पोलिस आयुक्त, एसीपी, डीसीपी यांच्यासह स्थानिक पोलिस स्थानकाच्या पोलिस निरीक्षकालाही निलंबित केलं आहे. त्याचसोबत आरसीबी संघ आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीविरोधात गुन्हा दाखल करून चार पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १८ वर्षांनंतर आयपीएल जिंकल्यानंतर बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडिअमवर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्टेडिअमच्या बाहेर मोठी गर्दी झाल्यानंतर चेंगराचेंगरीची घटना घडली. त्यामध्ये 11 जणांचा बळी गेला तर ५० हून अधिक लोक जखमी झाले. यानंतर आता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी कडक कारवाई केली आहे.

error: Content is protected !!