ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन; मेरी आवाज ही पहचान है


मुंबई/ आपल्या कोकीळ कंठ आवाजाने तब्बल सात दशके रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे काल सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या ९२ वया वर्षी दुःखद निधन झाले.आणि गेल्या आठ दिवसांपासून कोरना आणि निमोनियशी सुरू असलेली त्यांची झुंज संपली त्यांच्या निधनाबद्दल केवळ भारतवासी नव्हे तर जगभरातील संगीत प्रेमींनी दुःख व्यक्त केले आहे
लता मंगेशकर यांना गेल्या जानेवारीत कोरॉनाची लागण झाली होती त्यानंतर त्यांना ब्रीचं कँडी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते काही दिवसांनी उपचारानंतर त्यांना आराम पडल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला पण नंतर त्यांना निमोनिया झाला त्यामुळे त्यांना आठ दिवसांपूर्वी पुन्हा रुग्णालयात दखल करण्यात आले तिथे त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकली नाही शनिवारी त्यांची प्रकृती खूपच खालावली आणि काल काल सकाळी ११वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेक मान्यवरांनी ब्रिच कँडिकडे धाव घेतली नितीन गडकरी ,रश्मी ठाकरे ,सचिन तेंडुलकर ,अनुपम खेर आदिन रुग्णालयात जाऊन अंतिम दर्शन घेतले त्यानंतर त्यांचे पार्थिव पर्भुकुंज या त्यांच्या निवास स्थानी आणण्यात आले तिथे मुख्यमंत्री उदव ठाकरे, शरद पवार, राज्यपाल कोषारी आदींसह अनेक मान्यवरांनी जाऊन लतादीदींच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आणि कुटुंबीयांचे सांत्वन केले सायंकाळी पंतप्रधान मोदी यांनी मुंबईत येऊन लता दीदींच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि सायंकाळी लता दीदींच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशान भूमीत शासकीय इतमामात हजारोंच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले तत्पूर्वी काही काल त्यांचे पार्थिव शिवाजी पार्क येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते तेथे हजारो मुंबईकरांनी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली

error: Content is protected !!