[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्र

 सिमेंट रस्त्याचे निकृष्ठ काम–साकेत इन्फ्रा ह्या कंपनीला अभय

 सिमेंट रस्त्याचे निकृष्ठ कामामुळे पोलीस चौकी समोरच टेंपो अडकला खड्यात ! ..  

भिवंडी -भिवंडी – कल्याण – शीळ  या रस्त्याच्या कामात ठेकेदाराने हलगर्जीपणा व मनमानी कारभार केला असून या रस्त्याचे काम  निकृष्ट दर्जाचे केल्याची तक्रार मार्च २०२१ मध्ये नुकताच  पंचायतराज राज्यमंत्री पदाचा पदभार घेणारे खासदार कपिल पाटील यांच्यासह  महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे भिवंडी तालुका अध्यक्ष परेश चौधरी यांनी केली होती.  त्यातच रस्त्याचे निकृष्ठ काम झाल्याचे आता समोर आले असून या रस्त्यावरील कोनगाव पोलीस चौकी समोरच रस्ता व फुटपाथच्यामध्ये भगदाड पडून त्यामध्ये टेम्पो अडकल्याची घटना घडली आहे. यामुळे रस्त्याच्या कामाबाबत पुन्हा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.   

हलक्या  दर्जाचे सिमेंट काँक्रेट  रस्त्याच्या कामासाठी वापरल्याचा आरोप ..  

 भिवंडी – कल्याण – शीळ या मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्याने या  महामार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून सुरु आहे. या रस्त्यावरून कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली, उल्हासनगर तसेच मुरबाड येथे जाण्याकरीताचा एकमेव व महत्वाचा तसेच मुख्य रस्ता असून हजारो हलक्या व अवजड वाहनांची वाहतूक या रस्त्यावरून होत असते . भिवंडी-कल्याण-शिळ सहापदरी सिमेंट कॉक्रीटचा रस्ता बनविण्यात येत असून लॉकडाऊनच्या काळात देखील हे काम मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. परंतु या काळात तयार करण्यात आलेला रस्ता निकृष्ठ दर्जाचा असल्याची तक्रारी केल्या होत्या.  मे,साकेत इन्फ्रा ह्या कंपनीच्या माध्यमातून हलक्या  दर्जाचे सिमेंट काँक्रेट या रस्त्याच्या कामासाठी वापरले जात असून ठिकठिकाणी रस्त्याला तडे गेले असून कामही संथगतीने सुरु आहे. त्यामुळे आजही टोलनाका ते पिंपळघरपर्यत वाहतूक कोंडीची  समस्या कायमच आहे. 

error: Content is protected !!