मराठ्यांची एकजूट होताच परप्रांतियांना पोट शूळदुकाने बेमुदत बंद करून लॉक डाऊन सारखी स्थिती निर्माण करण्याचा इशारा
मुंबई – हिंदीच्या सक्तीच्या मुद्द्याच्या विरोधात मराठी माणसांची एकजूट होताच गुजराती मारवाडी लोकांना पोटशूळ उठला आहे.सरकारमध्ये या लोकांचे हितचिंतक बसलेले असल्याने त्यांच्या जीवावर आता गुजराती मारवाडी व्यापार्यांनी मराठी माणसांच्या विरोधात एकत्र येवून दुकाने बेमुदत बंद ठेवण्याचा आणि लॉक डाऊनसारखी परिस्थिती निर्माण करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. भाईंदर मध्ये एका मेळाव्यात गुजराती महिलेने तिथल्या गुजराती मारवाडी व्यापार्यांना तसे आव्हान केले आहे. तर असा प्रयत्न करूनच बघा मग मराठी माणूस काय करू शकतो हे तुम्हाला दिसेल असे प्रतिआव्हान मराठी माणसांनी दिले आहे. त्यामुळे आता गुजराती मारवाड्यांच्या या मुजोरी विरुद्ध स्थानिक भूमिपुत्र असलेला मराठी माणूस एकजूट होताना दिसत आहे. ठाकरे बंधूं एकत्र आल्याने मराठी माणसाच्या लढ्याला शिवसेना आणि मनसेची आक्रमक साथ मिळणार आहे . त्यामुळे आता गुजराती मारवाडी विरुद्ध मराठी माणूस यांच्यात संघर्ष अटल आहे. मात्र हा संघर्ष टाळायचा असेल तर इथल्या गुजराती मारवाडी व्यापार्यांनी भाजपच्या चिथावणीला बळी पडून मराठी माणसाच्या विरोधात संघर्षाची भाषा करू नये . कारण त्यांना इथे व्यापार करायचा आहे आणि मराठी माणूस हाच त्यांचा मुख्य ग्राहक आहे. मराठी माणसांनी यांच्या दुकानावर बहिष्कार टाकला तर त्यांना धंदा बंद करावा लागेल त्यामुळे भाजपच्या चिथावणीला बळी पडून मराठी माणसांशी लढायचे कि धंदा बंद करून गुजरात राजस्थानला परत जायचे याचा विचार त्यांनी करावा . कारण आता मराठी माणूस मागे हटणार नाही .
केंद्राच्या त्रिभाषा शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रात पहिली ते चौथी पर्यंत हिंदीची सक्ती करण्यात आली होती तिला माणसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेने विरोध करून या सक्तीच्या विरोधात मोर्चा काढण्याचा इशारा दिल्यानंतर घाबरलेल्या महायुती सरकारवर हिंदीच्या सक्तीचे दोन्ही जीआर मागे घेण्याची नामुष्की ओढवली. आणि एकप्रकारे मराठी माणसांचा विजय झाला शनिवारी वरळीच्या डोम सभागृहात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासह विविध पक्षातील मराठी नेत्यांनी एकत्र येवून विजयोत्सव साजरा केला यावेळी ठाकरे बंधूंचे भाषण ऐकण्यासाठी वरळीत तुफान गर्दी लोटली होती. यावेळी राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणात म्हणाले जे बाळासाहेब करू शकले नाहीत ते फडन्विसनी केले मुंबई वेगळी करता येते का हे पाहण्यासाठीच त्यांनी भाषेला डिवचले पण त्यांची राज्यात सत्ता असली तरी आमची रस्ताय्वर सत्ता आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे आज मोर्चा निघाला असता तर मराठी माणूस सर्व बाजूनी कसा एकवटतो हे बघायला मिळाले असते नुसत्या मोर्चाच्या चर्चेने त्यांना माघार घ्यावी लागली यापुढे महाराष्ट्राकडे कुणी वेड्या वाकड्या नजरेने बघायचे नाही असा इशाराही त्यांनी दिला. तर उद्धव ठाकरे यांनीही हल्लाबोल केला ते म्हणाले काळ एक गद्दार जय गुजरात म्हणाला मालकासमोर त्याने हि लाचारी पत्करली आपल्या मालकासमोर लाचार होऊन जी गुजरात म्हणणारा हा गद्दार बाळासाहेबांच्या विचारांचा पिक होऊ शकतो का त्यामुळे आताच डोळे उघडा नाहीतर कायमचे मिटतील आता आलेली जाग जाणार असेल तर स्वताला मराठी आईची मुले म्हणू नका तुम्ही पुष्पा चित्रपट पहिला असेल दाढीवरून हात फिरवीत म्हणतो झुकेगा नाही साला तसे हे गद्दार म्हणत आहेत उठेगा नाही साला कुछ्भी बोल उठेगा नही अरे कसा उठणार काय तुझ्याकडे आहे उठ्ण्यासारखे असे म्हणताच एकच हशा पिकला . मराठी माणसांची हि एकजूट अशीच कायम ठेवण्याचे उद्धव ठाकरे यांनी आव्हान केले.आहे ठाकरे बंधूंच्या या एकत्र मेळाव्याने भाजपची मात्र झोप उडाली आहे. दरम्यान राज ठाकरे अजूनही आपल्या सोबत येवू शकतात असा विश्वास भाजपला आहे त्यामुळे मेळाव्यानंतर भाजपा आणि महायुतीतील नेत्यांनी राज ठाकरेंवर टीका केली नाही केवळ उद्धव ठाकरेंवर टीका केली
