ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

शिवडीत मोबाईल चोराला अटक


मुंबई – शिवडी मध्ये एका सराईत मोबाईल चोराला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ९५ हजारांच्या ४ मोबाइलसह सव्वा लाखांची एक मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.
माझगाव येथे राहणारे व मर्चंट नेव्हीत काम करणारे नवनीत गौरीशंकर मिश्रा हेत्यांच्या दुचाकीवरून बीपीटी रॉड फ्रीवेच्या खाली त्यांच्या हातातीलसॅमसंग एम २० अल्ट्रा ग्रे रंगाचा मोबाईल हिसकावून चोरट्याने पलायन केले होते. ही घटना २७ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता घडली. या प्रकरणी शिवडी पोलीस ठाण्यात गु/र १२५/१४ कलाम ३२६,३२३ ५०४, १४३,१४७,१४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या गुन्ह्याचा सपोनि स्नेहलसिंग खुले आणि त्यांच्या पथकाने तपास करून या प्रकरणी कौला बंदर येथील जाफर अब्दुल शेख याला शिवडी फाटक येथून अटक करण्यात आली. त्याच्याकडे नवनीत मिश्रा यांचा सॅमसंगचा मोबाईल सापडलाशिवाय आणखी तीन मोबाईल सापडले. ज्यांची ५५ हजार इतकी किंमत आहे. आणि सव्वा लाखांची के टी एम मोटार सायकल सापडली

error: Content is protected !!