[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

जीआर फसवा! मराठा आरक्षणाबाबत संभ्रम कायममराठा नेत्यांचाच दावा


मुंबई/ मुंबईतील मराठा आंदोलनांना नंतर सरकारने जरांगे यांच्या ८ मागण्या मान्य केल्या होत्या .तसा जीआर काढला परंतु या जीआरचा काही उपयोग होणार नाही असे मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढणारे विनोद पाटील यांनी सांगितले. त्यातच मुख्यमंत्र्यांनी सरसकट हा शब्दच वगळल्याने संभ्रम निर्माण झाला आहे त्यामुळे जरांगे यांचे उपोषण आणि मराठ्यांचे मुंबईतील आंदोलन वाया जाणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.सरकारच्या जी आर बद्दल केवळ विनोद पाटीलच नव्हे तर जरंगे यांचे विश्वासू योगेश यांनीही संशय निर्माण व्यक्त केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर राज्य सरकारने काढलेल्या जीआरमुळे मराठा समाजाला काहीही नवे मिळाले नाही, असा पुनरुच्चार मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केला आहे. कालच्या जीआरमुळे समाजाला काहीही नवे मिळाले नाही. त्यामुळे मी लवकरच सक्षम वकिलांची फौज घेऊन न्यायालयात दाद मागणार आहे. मी समाजाचे खच्चीकरण व फसगत अजिबात होऊ देणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण केले. त्यांच्या आंदोलनानंतर सरकारने एक जीआर काढला. त्या जीआरद्वारे हैदराबाद गॅझेट लागू करण्याची घोषणा केली. सरकारच्या या निर्णयाचा मराठवाड्यातील मराठा समाजाला लाभ मिळण्याचा दावा केला जात आहे. पण सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी या जीआरचा मराठा समाजाला टाचणीएवढाही फायदा होणार नसल्याचा दावा करत नव्या वादाला फोडणी दिली आहे. या प्रकरणी मनोज जरांगेंनी त्यांच्यावर शिवराळ भाषेत टीका केली. पण त्यानंतरही विनोद पाटील यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचा पुनरुच्चार केला आहे.
विनोद पाटील गुरूवारी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले, एक गोष्ट लक्षात घ्या… वारंवार सांगितले जात आहे की, ५८ लाख नोंदी सापडल्या, ५८ लाख नोंदी सापडल्या. परंतु यातील विदर्भ, खानदेश, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील आजच्या आहेत का? मूळ प्रश्न हा आहे की, शिंदे समितीला नव्याने सापडलेल्या नोंदी किती? मराठवाड्यात फक्त ४८ हजार नोंदी सापडल्याचे सरकारात नमूद आहे. त्यानुसार २ लाख ३९ हजार अर्ज दाखल करण्यात आले आहेत. ही स्वागतार्ह बाब असून हा ही आपला विजयच आहे. पण मग बाकीच्या मराठ्यांचे काय? त्यांचा विचार कोण करणार?
मी हे सगळे बोलत असताना मला शिवीगाळ करण्यात आली. पण जे कागदपत्रावर दिसत आहे, त्याला काय म्हणणार? मी माझा लढा आजवर जसा लढलो, तसा कायम लढणार. मी या प्रकरणी लवकरच सक्षम वकिलांची फौज घेऊन न्यायालयात दाद मागणार आहे. समाजाचे खच्चीकरण होऊ देणार नाही. फसगत तर नाहीच नाही. पुन्हा पुन्हा स्पष्ट सांगतो की, कालच्या जीआर मध्ये समाजाला नव्याने काहीही मिळाले नाही? कोर्टात जाऊ, सर्वांना मिळणारे आरक्षण घेऊ. तुमच्या साथीने व आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने नक्कीच यश मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे.
विनोद पाटील यांच्या या खुलशामुळे आता सरकारने काढलेल्या जी आर बाबत मराठा समाजामध्ये संभ्रम आणि फूट पडल्याचे दिसत आहे.
मराठा आरक्षणाबाबत सरकारने जरांगे यांच्या काही मागण्या मान्य करून तसा जी आर काढल्याने अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच ओबीसींचे नेते छगन भुजबळ नाराज झाले आहेत. याच नाराजीतून त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकून सरकारचा जी आर विरुद्ध न्यायालयात जाण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री फडणवीस तसेच अजितदादा पवार आणि इतर मंत्र्यांकडून भुजबळांची मनधरणी सुरू आहे.

error: Content is protected !!