ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

कायदे सर्वांसाठी सारखे असावेत-राज ठाकरे करोनाचे राजकारण करू नका- उद्धव ठाकरे महाराष्ट्रात ठाकरी संग्राम



मुंबई/ सध्या संपूर्ण महाराष्ट्र करोनाचा दहशतीखाली गारठलेल्या असतानाच याच कोरोनावरून सध्या ठाकरे बंधुचे जोरदार कलगीतुरा सुरू झाला आहे.मात्र त्यांचा हा कलगीतुरा म्हणजे महाराष्ट्रासाठी बिन पैशाचा तमाशा असल्याचे लोक म्हणत आहेत .
काल राज ठाकरे यांनी पुण्यात माणसे कार्यकर्त्यांचा मेळा आयोजित केला होता या मेळाव्यात बोलताना त्यांनी करोना रोखण्यासाठी जे कठोर निर्बंध लादले आहेत त्यावरून सरकारवर कठोर शब्दात टीका केली की ओबसी च्या नावाखाली निवडणुका पुढे ढकलण्याचा सरकारचा देव आहे ते म्हणाले तुमच्या कार्यक्रमांना गर्दी चालते फक्त गणेशोत्सवाला गर्दी नको ही कुठली पद्धत असा सवाल त्यांनी केला . नियम असेल तर तो सर्वांना सारखा हवा इथे करोनाची फक्त भीती दाखवली जातेय कारण या लॉक डाऊन मध्ये जे चाललं आहे ते बरे चालले आहे असेच सरकारला वाटते कारण आंदोलने नाहीत मोर्चे नाहीत सरकारविरुद्ध कुणी बोलायचं नाही रस्त्यावर कुणी उतरायचे नाही बस आपापली दुकाने चालवा पैसे कामवा हीच सरकारची भूमिका आहे असे राज ठाकरे यांनी सांगितले तर त्याला उत्तर देताना माझा डॉकटर परिषदेत उद्वव ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले ते म्हणाले करोनाचे राजकारण करून विरोधी पक्ष जनतेच्या जीवाशी खेळत आहे आंदोलने करायचीच असतील तर करोनाच्या विरुद्ध आंदोलने करा सध्या राज्यात अनेक जणांकडून घाई घाईने अनेक गोष्टी उघडण्यासाठी आग्रह धरला जातोय मात्र ही घाई सर्वसामान्यांसाठी घातक ठरू शकते तसे पाहता गेल्या वर्षीच्या तुलनेत सना वरच्या काळात आपण अनेक गोष्टी खुल्या केल्या आहेत .हे सुधा ध्यानात घ्या असे म्हणत त्यांनी सरकार योग्य दिशेने काम करीत असल्याचे स्पष्ट केले

error: Content is protected !!